Tarun Bharat

कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान तातडीने द्यावे : राजू शेट्टी

शिरोळ प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या शासनाने प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, यासह अन्य मागण्यासाठी येत्या 13 तारखे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे बजेट ही मंजूर करण्यात आले आहे. ते तातडीने शासनाने शेतकऱ्यांच्या खातावर जमा करावे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी या पैशाचा उपयोग होणार आहे. त्यमुळे राजकीय श्रेयवादासाठी शेतकऱ्यांना वेटीस धरू नका.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपयांची केलेली तरतूद कामासाठी वर्ग होण्याची भीती व्यक्त करून जिल्ह्यातील सर्वच सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी केले.

Related Stories

शिवसेनेच्या पत्रानुसार प्राधिकरणाने केले कार्यवाही

Patil_p

गटसचिवांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे

Kalyani Amanagi

पुरस्कार घ्यायला पुढे जाणारे आता कुठे गेले?

Patil_p

महापालिकेच्या शाळा झाल्या स्मार्ट

Archana Banage

“राज्यपालांविरोधात कोर्टात जावं लागणं हे आमच्या घटनेचं दुर्दैवं”

Archana Banage

गळीत हंगाम सुरु करण्यास कारखान्यासमोर पावसाची अडचण

Archana Banage