Tarun Bharat

महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं दुःख नाही- राजू शेट्टी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदार शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होत आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशात आता या संपूर्ण परिस्थितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही, असं राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हटलं आहे. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, शेट्टी यांनी भाजपलाही यावरुन टोला लगावला आहे.

भाजपाकडे असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत आहेत. असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपावर टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “ भाजपा ज्या पद्धतीने पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यांपूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेले नाही हे स्पष्ट झाल आहे.”

Related Stories

शहराच्या मध्यवर्ती भागातील शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करा

Abhijeet Shinde

गडकरीसह पालखीमार्गाच्या भूमिपूजनास पंतप्रधान मोदी पंढरपूरात…

Abhijeet Shinde

सर्वच पक्ष भाजपला मतदान करतील, नेमके काय म्हणाले धनंजय महाडिक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जुने ते सोने असणारी पाटलांची मोटार…..

Abhijeet Shinde

`अॅटो फायर बॉल’ करणार रेकॉर्ड रुमची सुरक्षा

Abhijeet Shinde

शिरोली येथील गोडाऊन फोडून सुमारे सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल लंपास, पाच जण अटकेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!