Tarun Bharat

राजू श्रीवास्तव 15 दिवसांनी शुद्धीवर

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंबंधी दिलासादायी वार्ता गुरुवारी वैद्यकीय अधिकाऱयांनी दिले. एम्समधील उपचारांदरम्यान गुरुवारी पंधराव्या दिवशी त्यांना शुद्धी आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. राजूचे मेहुणे आशिष श्रीवास्तव यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिने सोशल मीडियावर वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली. ‘माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे. ते हळूहळू बरे होत आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत’ असे तिने सांगितले. राजू यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

राजू श्रीवास्तव गुरुवारी सकाळच्या सुमारास एम्सच्या वैद्यकीय कर्मचाऱयांशी हातवारे करत बोलला. नर्सला हातवारे करून त्यांनी आपण येथे कसे काय आलो? अशी विचारणा केली, असे एम्सकडून सांगण्यात आले. मात्र, राजू यांची मुलगी अंतर हिने यासंबंध्घ कोणतीही माहिती त्यांनी शेअर केलेली नाही.

Related Stories

कल्पक उपाय योजा, धार्मिक नेत्यांचे साहाय्य घ्या !

Patil_p

स्मार्ट पोलिसिंग बळकट करणार!

Patil_p

दमणमध्ये आता कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar

आगामी काळात महागाई कमी होणार

Patil_p

वैद्यकीय शिक्षणासाठी चीनमध्ये जाण्यास अनुमती

Patil_p

निवडणूक आयोगाची स्वायत्तता सुनिश्चित असावी

Patil_p
error: Content is protected !!