Tarun Bharat

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत अंशतः सुधारणा

Advertisements

नवी दिल्ली

 कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री उशिरापासून त्यांच्या शरीरात हालचाल दिसून येत आहे. एम्समध्ये त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सकारात्मक संकेत दिले असले तरी पुढील तीन दिवस म्हणजे 72 तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. अधिक उपचारासाठी लखनौ पीजीआयमधून डॉक्टरांचे एक पॅनेलही पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे, बहीण सुधा श्रीवास्तव यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना आयसीयूमध्ये राखी बांधली आणि भावाच्या लवकर बरे होण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

राजू श्रीवास्तव हे बुधवारी सकाळी व्यायामासाठी जिममध्ये गेले असता तेथेच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. अचानक छातीत दुखू लागल्यानंतर ते बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्समधील हृदयरोगतज्ञ डॉ. संदीप सेठ यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधानांकडून विचारपूस

रात्री दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू यांच्या पत्नी शिखा यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही सतत आरोग्यविषयक अपडेट्स घेत आहेत. गायक सोनू निगम यांनीही राजूच्या पत्नीशी संवाद साधला. त्यांनी राजूला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कॉमेडियन जॉनी लिव्हरनेही राजू यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; मागील २४ तासात ८ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू

Patil_p

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार

Patil_p

TMC च्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

datta jadhav

तिकिटवाटपावरून शेतकरी संघटनांमध्ये मतभेद

Amit Kulkarni

उत्तराखंड : कोरोनापेक्षा अधिक घातक ‘ब्लॅक फंगस’; मृत्यू दर 15.73 %

Rohan_P
error: Content is protected !!