Tarun Bharat

Rajya Sabha Election LIVE : सर्वपक्षीय २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, मात्र मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार

Advertisements

मुंबई: राज्यसभेच्या मतदानासाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. दिवसभरात अनेक घडामोडी घडल्यानंतर दुपारपर्यंत २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदान केले. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी ही ५ वाजता सुरू होणार आहे. मात्र भाजपने आक्षेप घेतल्याने मतमोडणी सुरु होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे निकालही वेळेने लागेल. या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे.


आज सकाळपासूनच भाजप आणि महविकास आघाडीचे आमदार विधान भवनाकडे रवाना झाले. आपापले उमेदवार विजयी करण्यासाठीं दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. मविआचे चारही उमेदवार निवडून येणार असा विश्वाास मंत्री विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे. एमआयएम आणि सपाने पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. मविआकडे पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

-बाळसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद कायम राहिला आहे.त्यामुळे संजय पवार साहेब यांचा विजय होईल असा विश्वास संजय पवार त्यांच्या पत्नी जोस्त्ना पवार यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या घरी पूजाअर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार पवार साहेब यांच्या पाठीशी उभा राहतील. असेही त्या म्हणाल्या.

-काल रात्री चांगली झोप लागली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अगदी योग्य रणनीती आखली आहे. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची जुळवाजुळव झाल्याचा दावा धनंजय महाडिक यांनी केला.

– राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेनेचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून रवाना झाले आहेत. निकालानंतर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेवर गेलेले दिसतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

-पहिल्या तासात 60 पेक्षा अधिक आमदारांनी केले मतदान, राष्ट्रवादीच्या 25, तर भाजपच्या 22 आमदारांचे मतदान, काँग्रेसच्या 15 आमदारांनी केले मतदान

-पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण झाले असून एकूण 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत भाजपाच्या 60 हून अधिक आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे.

-बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार दोन वाजता मतदान करणार

-शिवसेनेच्या आमदारांच मतदान सुरु

-आदित्य ठाकरे विधानभवनाकडे रवाना

-मंत्री नवाब मलिकांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरु.

-अॅड. अमित देसाई मलिकांची बाजू मांडत आहेत.

-भास्कर जाधव, सुनिल राऊतांनी केलं मतदान-

-आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केलं.

-राष्ट्रवादीच्या पहिल्या पसंदीची १० मतं संजय पवार यांना

-काॅंग्रेसकडून आवश्यक ४२ मतदानाचा कोटा पूर्ण

-सर्वपक्षीय एकूण २६० आमदारांच मतदान पूर्ण

-जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपचाआक्षेप.

-मविआ अपक्ष आमदारांची पहिली पसंती संजय पवारांना.

-दुसरा पसंती क्रम संजय राऊत आणि तिसरा पसंतीक्रम प्रफुल्ल पटेल यांना आहे.

-शिवसेना आणि काॅंग्रेस नेत्यांची बैठक सुरु.

-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची अतिरिक्त ११ मतं संजय पवारांना मिळाली.

-राष्ट्रवादीची ९ आणि काॅंग्रेसची २ अशी ११ मते मिळाली.

-२८१ आमदारांनी मतदान केले आहे.

-यशोमती ठाकूर , आव्हाडांच्या मतपत्रिकेवर फेरसुनावणी सुरु

– मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. असून थोड्याचवेळात मतमोजणीला सुरवात होईल.

-आतापर्यत २८० आमदारांनी मतदान केले आहे.

-सर्वपक्षीय २८५ आमदारांचं मतदान पूर्ण

-राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी २८५ आमदारांकडून मतदान, पहिल्या प्राधान्याच्या मतांसाठी ४०.७२ चा कोटाRelated Stories

शिवरायांनाही रोखण्याचे प्रयत्न झाले होते

Abhijeet Khandekar

कोरोनाचा विस्फोट : देशात पहिल्यांदाच 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण; 3,523 मृत्यू

Rohan_P

‘या’ फोटोत राधिका दिसते कुणाल पंड्यासारखी

Abhijeet Shinde

तक्रारदार नगरसेवकांचाच अतिक्रमणांमुळे अपघात

Patil_p

सातारचा बाल लेखक अथर्वची जागतिक स्तरावर दखल

Patil_p

कर्नाटकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!