Tarun Bharat

राज्यसभा निवडणुकीसाठी ED आणि CBI चा वापर होण्याची शक्यता? – संजय राऊत

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई: मनी लाँड्रिंग प्रकरणी नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली. या अटकेनंतर भाजपा विरोधात सत्ताधाऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. जे भाजपाच्या विरोधात उभे राहतात त्यांच्यावर धाडी टाकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाविषयी भाष्य करताना ते म्हणाले, देशात जे काही चाललं आहे ते लोकशाहीसाठी पुरक नाही. जे कोणी विरोधात उभे रहातील त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत. महाराष्ट्रात दबावाचं राजकारण सुरु आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारनं मार्शल लॉ लावून हुकुमशाही जाहीर करावी असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात अगामी राज्यासभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) ईडी आणि सीबीआयचा वापर करतील का अशी भिती वाटायला लागलेय. मात्र शिवसेनेने पक्षाचा सहावा उमेदवार दिला असून ती जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावाही राऊतांनी केला. भाजपाला कितीही घोडे उधळू द्या, आम्हीच जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

आमदार नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल

Archana Banage

नवीन सौरऊर्जा धोरणासाठी उच्चस्तरिय समितीचे गठन

Tousif Mujawar

डोंबिवली गँगरेप प्रकरणात धक्कादायक खुलासा

Archana Banage

अल्पसंख्यांक बचत गटांनाही पतपुरवठा करा – राजू शेट्टी

Archana Banage

देशात संसर्गवाढ धोकादायक पातळीवर

Patil_p

महाविकास आघाडीत एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जाणार नाही – उपमुख्यमंत्री

Archana Banage
error: Content is protected !!