Tarun Bharat

एक मत जास्त तरीही काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पराभव

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

महाराष्ट्राप्रमाणे हरियाणातही (Haryana) रात्री उशिरा मतमोजणी सुरु झाली. आमदारांकडून मतदानावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आरोप कऱण्यता आले होते. त्यामुळे रात्री उशिरा मतमोजणी सुरू झाल्यानंतर मध्यरात्री ३ नंतर निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपचा १ आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसचे (congress) वरिष्ठ नेते अजय माकन (ajay makan) यांना पराभव पत्करावा लागला.

हरियाणाता भाजपचे कृष्ण लाल पंवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेसचे अजय माकन यांना पराभवाचा धक्का बसला आहे. फक्त एका मतामुळे माकन यांचा पराभव झाला. राज्यसभेसाठी एक मत १०० मतांच्या बरोबर मानलं जातं. यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाने काँग्रेसचं एक मत बाद ठरवलं होतं.

अधिक वाचा: “बोरू बहाद्दर कारकून आणि ‘ढ’ टीम चे कप्तान तोंडावर आपटले”; मनसेचा शिवसेनेवर निशाणा

भाजपचे उमेदवार कृष्ण लाल यांना ३१ मते होती, तर अपक्ष उमेदवार कार्तिकेय यांना २८ आणि काँग्रेसचे अजय माकन यांना २९ मते मिळाली होती. मात्र एक मत अवैध ठरले आणि एका अपक्ष उमेदवाराने मत दिले नाही. त्यामुळे ८८ मते उरली आणि उमेदवारांना विजयासाठीचा कोटा २९.३४ असा झाला. यात पंवार यांना ३१ मते मिळाली होती. त्यांचे वरचे १.६६ टक्के मत भाजप पुरस्कृत उमेदवाराला गेले. कारण कार्तिकेय हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार होते. कार्तिकेय यांना आधी पडलेली २८ मते आणि भाजपचे पंवार यांची १.६६ टक्के मते मिळून २९.६६ मते झाली. तर अजय माकन हे २९ मतांवरच राहिल्याने त्यांचा पराभव झाला.

Related Stories

सोलापुरात आज 41 कोरोना पॉझिटिव्ह, सहा बळी

Abhijeet Shinde

पवारांचा डबल गेम? शिवसेनेआडून संभाजीराजेंची कोंडी, स्वतंत्र अस्तित्व संपवण्याचा कट?

Rahul Gadkar

कोल्हापूर : ‘झेडपी’तील कामकाज उद्यापासून पूर्ववत

Abhijeet Shinde

देशात मान्सूनचे 100 डेज्

Abhijeet Shinde

गौणखनिज प्रकरणी ११ जणांच्या मालमत्तेचा होणार लिलाव

Abhijeet Shinde

मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही : संजय राऊत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!