ऑनलाईन टीम/तरुण भारत
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आज राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीवरून गैप्यस्फोट करताच संभाजीराजे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभेच्या सहाच्या जागेसाठी संभाजीराजे यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. संभाजीराजे यांनी पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर उमेदवारी पाहिजे असल्यास मुख्यमंत्र्यांनी हातात शिवबंधन बांधण्याची अट घातली. पण संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफार नाकारत अपक्षच लढण्याचा निर्णय घेतला. यांनतर शिवसेनेने आपला सहावा उमेदवार दिल्याने संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यांनतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत संभाजीराजे यांच्यावर अन्याय झाला आहे, असा आरोप केला होता. यासर्व प्रकारावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आज भाष्य केले.
तर यावर आता संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते सत्यच होतं. आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही” असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. असंही ते म्हणाले.


शाहू महाराज काय म्हणाले होते?
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांवर शब्द फिरवण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शाहू महाराज म्हणाले होते की, छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता असेही शाहू महाराज म्हणाले. तसेच आमच्यात काही विचारविनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती. काही झालं असतं. पण तसा काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता. पण तसं काही झालं नाही,” असे श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.
”
.