Tarun Bharat

राकेश झुनझुनवाला यांचे हृदयविकार धक्क्याने निधन

Advertisements

शेअरबाजारातील गुंतवणुकीमुळे भारताचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख

मुंबई / वृत्तसंस्था

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या 62 व्या वषी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. त्यांचे बंधू दुबईमध्ये असून ते मायदेशी आल्यानंतर झुनझुनवाला यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

गेल्या काही महिन्यांपासून झुनझुनवाला मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. तसेच त्यांना मधुमेह असल्यामुळे ते विविध व्याधींच्या विळख्यात अडकले होते. गेले काही दिवस त्यांची तब्येत खराब होती. त्यांच्या किडनीमध्ये काही समस्या होती. आपल्या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते व्हीलचेअरवर दृष्टीस पडले होते. 1985 साली भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकीर्द सुरू केली होती. गेल्या आठवडय़ातच त्यांनी ‘अकासा’ ही एअरलाईन्स सुरू केली होती. सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 5.8 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 46 हजार कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सच्या 2021 च्या यादीनुसार श्रीमंतांच्या यादीत त्यांचे स्थान 36 व्या स्थानी होते.

पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आर्थिक जगतात अमिट छाप सोडली आहे. राकेश झुनझुनवाला हे चैतन्य, बुद्धिमान आणि समजूतदार व्यक्ती होते, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही शोक व्यक्त करताना झुनझुनवाला यांना शेअर बाजाराची चांगली समज होती. त्यांच्याशी माझे अनेकदा बोलणे झाले. भारताच्या ताकदीवर आणि क्षमतेवर त्यांचा विश्वास होता, असे सीतारामन म्हणाल्या.

गुंतवणूकदारांचे ‘मार्गदर्शक’

सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येते हे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱया व्यक्तींपैकी एक म्हणजे झुनझुनवाला होते. शेअर बाजार हा मोजक्मया अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात हे झुनझुनवाला यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिल्यामुळेच मध्यमवर्गीयांना त्यांच्या टिप्स नेहमी मार्गदर्शक ठरल्या. भारताचे ‘वॉरेन बफे’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. तसेच त्यांना भारतीय बाजारपेठेतील ‘बिग बुल’ असेही संबोधले जात होते.

ऑडिटऐवजी निवडला ‘दलाल पथ’

महाविद्यालयीन काळात झुनझुनवाला यांनी भारतीय शेअर बाजारात फक्त 5,000 रुपयांच्या भांडवलाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांनी अलीकडेच जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे आणि इंडिगोचे माजी प्रमुख आदित्य घोष यांच्यासमवेत देशातील नवीन कमी किमतीची एअरलाईन ‘अकासा एअर’ सुरू केली. विमान कंपनीने आठवडय़ापूर्वी मुंबई ते अहमदाबाद या विमानाने आपले कामकाज सुरू केले. झुनझुनवाला (सीए) यांनी कंपन्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याऐवजी शेअर बाजारात गुंतवणुकीचा ‘दलाल पथ’ निवडला होता.

झुनझुनवाला मधुमेहाचे रुग्ण

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे मधुमेहाचे रुग्ण होते. गेल्या काही दिवसात पायाला सूज आल्यामुळे त्यांना नीट चालता येत नव्हते. त्यामुळेच गेली अनेक वर्षे ते व्हीलचेअरवर दिसायचे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी राकेश झुनझुनवाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आले होते, तेव्हाही ते व्हीलचेअरवर होते. काही दिवसांपूर्वी राकेश झुनझुनवाला यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते व्हीलचेअरवर बसून कजरारे कजरारे गाण्यावर ताल धरताना दिसले होते.

Related Stories

म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा आजार नाही : डॉ. गुलेरिया

Abhijeet Shinde

उद्योगांसह गरिबांवर लवकरच ‘अर्थ’वर्षाव

Patil_p

पुलवामात ‘जैश’च्या मॉड्यूलचा पर्दाफाश

datta jadhav

शेतकरी, लघुउद्योजकांना आणखी दिलासा

Patil_p

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

चिदंबरम यांच्या 9 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी

datta jadhav
error: Content is protected !!