ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत सोमवारी नवी दिल्लीत तेलंगणाच्या नेत्यांनी पुकारलेल्या धान खरेदी धोरणाविरोधी निदर्शनात सामील झाले.
केंद्राच्या धान खरेदीचा विरोध करण्यासाठी तेलंगणाच्या नेत्यांनी निदर्शने केली. या निदर्शनात सहभागी होताना ते म्हणाले की देशात आणखी एक निषेध करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चा पाठबळ देईल असेही टिकैत यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संबोधित करताना भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, “देशात आणखी एका आंदोलनाची गरज आहे. आजचे निदर्शन हे राजकीय व्यासपीठ नाही. तेलंगणा मुख्यमंत्री केसीआर हे स्वत: शेतकरी आहेत; ते मतांचे राजकारण करत नाहीत. ते एक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे संयुक्त किसान मोर्चा त्यांच्यासोबत असेल.”