प्रतिनिधी /पणजी
एक राखी सामाजिक बांधिलकीसाठी’ ही भावना समोर ठेवून सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन साळ ,या शाळेत मोठय़ा उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. ’ प्रशिक्षण, प्रदर्शन ,स्पर्धा, विक्री अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती.या विक्रीसाठी ठेवलेल्या राखीतून मिळणारे मूल्य फोंडा तालुक्मयातील ’कातकर ’ समाजातील गरीब लोकांना मदतकार्य म्हणून दिली जाणार आहेत. प्रशिक्षण, प्रदर्शन ,स्पर्धा, विक्री अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती. भावी शिक्षिका कु. गौरी पाटील व भावी शिक्षिका कु. स्नेहा देसाई तसेच पालक वर्ग यांनी शाळेतील सर्व मुलांना राखी बनवण्याचे प्रशिक्षण व सहकार्य केले. मुलांनी तयार केलेल्या राख्या शाळेच्या आवारात स्पर्धेसाठी व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. ’दोडामार्ग इंग्लिश हायस्कूल’ दोडामार्ग शाळेतील कलाशिक्षक श्री योगेश शिरीष गावीत सर, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, प्रशिक्षक, मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन श्री योगेश सुरेश गावित सर ,अध्यक्ष ऋतुजा गवस ,पालक रामचंद्र मुळगावकर, शाळेचे मुख्याध्यापक धाकटू पाटील, स्नेहा देसाई तसेच विद्यार्थी वर्ग यांनी सोनीमुखीच्या झाडाला जलपान करून व राखी बांधून पर्यावरण जागृती या ठिकाणी व्यक्त केली . कु. समृद्धी जाधव हिने रक्षाबंधन विषयी माहिती सांगितली. शिक्षिका स्मिता महेश राऊळ हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तसेच रक्षाबंधन आपण का साजरा करतो याबद्दल मुलांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले श्री योगेश शिरीष गावित सरांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल मुलांचे तसेच शिक्षकांचे खूप कौतुक केले. तसेच आपणही चित्रकला विषयाबद्दल सर्व मुलांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.
राखी स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली होती .’अ ’ गट पहिली व दुसरी ,’ब’ गट तिसरी चौथी व ’क’ गट बालवाडी या गटामध्ये घेतली होती .या पूर्ण राखी स्पर्धेचे परिक्षण योगेश गावित सरांनी केले. या स्पर्धेचे विजेते असे– ’अ’ गट(1 ली व 2 री) 1) ओम प्रसाद ठाकूर 2)प्रथम मर्तोजी तारी , 3) श्रीयश प्रवीण सावंत व रुची रामचंद्र मळगावकर
’ब’ गट ( 3 री व 4 थी) 1) समृद्धी शंकर जाधव 2) पालवी संकेत नाईक 3) ऋतुराज प्रकाश गवस व सदांश संदेश सावंत .
’क’ गट ( बालवाडी) 1) स्वरा शंकर जाधव 2) माही सुंदर नाईक 3) शिवम नाईक व आराध्य सावंत . कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षकांनी केले तसेच आभार प्रदर्शन स्नेहा देसाई हिने केले.