Tarun Bharat

‘छतरीवाली’मध्ये दिसणार रकुल प्रीत

ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच ‘छतरीवाली’ या चित्रपटात दिसून येणार आहे. रकुलने स्वतःच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केले आहे. रकुल या चित्रपटाद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे. चित्रपटाच्या  पोस्टरमध्sय रकुल मानवी शरीराचा चार्ट पाहताना दिसून येते. हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

रकुलचा हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे रकुल चाहत्यांना एक चांगला संदेश देणार आहे. चित्रपट नेमका कधी  प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तेजस प्रभा विजय देओस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘छतरीवाली’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. तर रॉनी स्पूवाला यांनी याची निर्मिती केली आहे. रकुल ही बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही सक्रीय आहे.

Related Stories

युपीचं माहीत नाही…पण बॉलीवूड मुंबईतच- मंत्री सुधीर मुनगंटीवार

Abhijeet Khandekar

भूतकाळ कळल्याने घडणार अघटीत!

Patil_p

पांडू म्हणतोय ‘सूचनांचं पालन करायला इसरु नका’

Archana Banage

सामंथा प्रभू पोहोचली ऋषिकेशमध्ये

Patil_p

काजलने संपविले ‘उमा’चे चित्रिकरण

Patil_p

करण जोहरची ही कला परिणितीला झाली असह्य

Archana Banage