कोल्हापूर प्रतिनिधी
संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शनिवारी (दि. 26) संविधान रॅलीचे आयोजन केले आहे. सकाळी 8.30 वाजता बिंदू चौक येथून निघणाऱ्या या रॅलीत नागरीकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
हेहि वाचा : शाहू मिलमध्ये राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक उभारणार
रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- कोल्हापूर महानगरपालिका- गगांराम कांबळे यांची समाधी असे मार्गक्रमण करुन पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातून- दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारोप होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 8.30 बिंदु चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर रॅली निघेल.