प्रतिनिधी/ बेळगाव
पतंजली योग समितीच्यावतीने खानापूर मांगिरिश हॉलमध्ये रामनवमी साजरी करण्यात आली. प्रारंभी जोतिबा भादवणकर यांनी अग्निहोत्र केले. किरण मनोळकर यांनी पतंजलीबद्दल माहिती दिली. अंजली गाडगीळ यांनी राम स्तोत्र व श्री रामकथा सांगितली व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बेळगावहून मोहन बागेवाडी, चंद्रकांत खंडागळे, पुरुषोत्तम पटेल, संगीताजी, श्वेताजी, खानापूरहून सुभाष देशपांडे, नरसिंह भट्ट, निर्मला देसाई, अरविंद कुलकर्णी, वसंत देसाई व पतंजलीचे सदस्य, योगसाधक उपस्थित होते.