प्रतिनिधी /म्हापसा
श्रीराम राज्य दिग्वजिय रथयात्रा 2022 ही ‘विजया दशमी’ (5 ऑक्टोबर 2022) या दिवशी श्री क्षेत्र अयोध्या येथून निघालेली असून संपूर्ण भारत व नेपाळ असा 60 दिवसांचा प्रवास करून ‘गीता जयंती’ला (3 डिसेंबर 2022) हिचे परत अयोध्ये आगमन होईल. या यात्रेचे नेतृत्व परमपूज्य श्री. शक्ती शांतानंदमहर्षा हे करीत आहेत. रथ यात्रेसोबत 40-50 कार्यकर्तेही असतील.
या रथ यात्रेचे उत्तर गोव्यात श्री बोडगेश्वर संस्थान म्हापसा येथे शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वा. आगमन होणार आहे. या रथयात्रेचा या स्थानी केवळ एकच तास मुक्काम असेल. तरी उत्तर गोव्यातील सर्व मंदिराध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱयांनी या यात्रेचे भव्य स्वागत करण्यासाठी उपस्थित राहून उत्साहपूर्वक सहयोग देऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यावे अशी माहिती रामराज्य दिग्विजय रथ यात्रा समिती उत्तर गोवाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यासपीठावर श्री बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर, प्रमोद सांगोडकर, विलास पिळर्णकर, देवेंद्र राटवळ, अमर कवळेकर, जयेश थळी, भवरलाल रिंदवा, अशोक साळगावकर उपस्थित होते.
15 मिनिटाचे स्वामीजीचे यावेळी आशीर्वचन होणार असून त्यानंतर येथील कार्यक्रमानंतर लगेचच ही रथयात्रा दक्षिण गोव्यात बास्कोला रवाना होईल असे वालावलकर यांनी सांगितले. प.पू. रामाची रथयात्रा उत्तर गोव्यात एकमेव ठिकाणी येत आहे हे म्हापसा वासियांना अभिनंदनाची गोष्ट आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंगदल. साडेपाच वर्षात अडीच लाखाचे मंदिरासाठी बळी गेले आहे. आता मंदिर उभारताना आनंदोत्सव साजरा करण्यासाठी साधू संतांनी रथयात्रेचे आयोजन केले. रथयात्रेची प्रतिकृती रथयात्रेत सामील होणार आहे. जेणेकरून त्याचे दर्शन सर्वत्र व्हावे हा उद्देश आहे. मोठी यात्रा सुरू झाली आहे. शनिवारी 5 रोजी म्हापशात बोडगेश्वर मंदिराजवळ आगमन होणार आहे. सावंतवाडीहून थेट रथयात्रा म्हापशात येईल.
40 साधू संत उपस्थित राहणार
या यात्रेचे नेतृत्व प.पू. शांतानंद महर्षी करणार आहे. या रथयात्रेबरोबर 40 साधूसंत उपस्थित राहणार आहेत. खरी दिवाळी 5 नोव्हेंबरला त्याच दिवशी तुळशी विवाह आहे यासाठी उत्तर गोव्याच्या वाळपई ते पेडणे, पर्वरी ते तिसवाडी सर्व मंदिर प्रमुखाशी संपर्क साधलेला आहे त्याचा सहभाग लाभेल. बोडगेश्वर मंदिराजवळ येऊन रथाचे व पादुकाचे सर्वांनी दर्शन घ्यावे. रथाचे स्वागत गोवा राज्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करणार आहेत. ते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला 2500 लोकांची उपस्थिती राहणार आहे. सुरक्षा यंत्रणा, पोलिसांचे आम्हाला सहकार्य लाभणार आहे. एक तास रथयाश्न म्हापशात राहणार आहे त्यानंतर वास्कोला रवाना होणार आहे.
राम राज्य दिग्विजय रथ यात्रा समिती-उत्तर गोवाः
अध्यक्ष -संजय पू. वालावलकर, सचिव-विलास मा.पिळलाकर, उपाध्यक्ष- आनंद भाईडकर, उपसचिव-वामन पंडीत, सभासद सदस्य-दिपक गोवेकर, सत्यवान भिवशेट, संतोष बामणे, अशोक साळठा, देवेंद्र रावळ, अमर कवळेकर, भवरलाल हिंदवा, दत्ताराम चौधरी, गणपतसीश सोलंकी, सुशांत गोवेकर, शिरीष दिवकर, प्रमोद सांगोडकर, हर्षद स्वार, नारायण शिंदे, नारायण राटवड, श्रीराम च्यारी, गोवींद शिरोडकर, सुशिल शुक्ला, सिद्धार्थ डकर मडकईकर, सुहास रेडकर, शंभूसिंग पराडीया, सुशांत साळगावकर, मोहन आमशेकर, आनंद देसाई, प्रसाद साळगावकर, शामसुंदर पेडणेकर, शामसुंदर वि. नाईक, सुशांत गावकार, पांडूरंग वराडकर, रामदास साळकरे, श्रीराम शिंदे, डॉ. नूतन बिचोलकर, जयेश भळी.