भक्तीची रुपे अनंत असतात. रामाचे नाव लिहिता लिहिता त्याच नावांमधून प्रभू रामचंद्रांचेच चित्र रेखाटण्याचा एक अनोखा भक्तीप्रकार नुकताच पहावयास मिळाला आहे. सध्या सोशल मिडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो थोडय़ा कालावधीत मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झाला आहे.
ही तरुणी कागदावर रामाचे नाव लिहिता लिहिता त्याच नावांमधून रामाचेच चित्र तयार करताना दिसून येते. रामाबरोबर सीता, लक्ष्मण, हनुमान असे रामपंचायतनाचे चित्र लिलया तयार करते. एक चित्र तयार करण्यासाठी तिला 1 लाखाहून अधिक वेळा लिहावे लागते. ही अनोखी कला असून ती या तरुणीने स्वप्रयत्नाने विकसीत केली आहे. तिचे हे कौशल्य पाहून आपण आश्चर्यचकित होण्यावाचून काहीही करु शकत नाही. ही युवती रंगीत पेनांच्या साहाय्याने एका पांढऱया कागदावर राम राम असे लिहिताना आढळते. काही वेळानंतर या नामलेखनातूनच रामाचे एक अप्रतिम चित्र तयार झाल्याचे दिसून येते.