Tarun Bharat

गोवा मुख्य निवडणूक अधिकारीपदी रमेश वर्मा

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी (आयएएस) रमेश वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली आहे. तथापि त्यांच्याजवळ अन्य कोणतीही जबाबदारी दिली जाऊ नये, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा सरकारला कळविले आहे.

मुख्य निवडणूक आयोगाकडे आता लवकरच गोव्यातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी होणारे मतदान व निवडणुकीची जबाबदारी राहणारआहे. त्यानंतर 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीचीदेखील महत्त्वाची जबाबदारी राहील. मध्यंतरीच्या काळात या अधिकाऱयांकडे कोणतेही काम नसते. म्हणून गोवा सरकार अशा आयएएस अधिकाऱयांकडे प्रशासनातील इतर कामांचीही जबाबदारी देत असते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास आक्षेप घेतला असल्याने रमेश वर्मा हे केवळ निवडणुकीचीच जबाबदारी पाहतील.

Related Stories

वादळी वारा, पावसामुळे वास्को परिसरात पडझड

Amit Kulkarni

रामनाथ दामोदर देवस्थानाला राज्यपाल पिल्लई यांची भेट

Amit Kulkarni

डिचोलीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक 1 जुलै रोजी

Amit Kulkarni

पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

Amit Kulkarni

फोंडा नगराध्यक्षपदावरुन भाजपामध्ये बंडाचे संकेत

Amit Kulkarni

‘कर्णिका’ जहाजावरील गोमंतकीय खलाशांची मदतीची हाक

Omkar B
error: Content is protected !!