वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या एटीपी टूरवरील टाटा पुरस्कृत खुल्या महाराष्ट्र पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनचे आव्हान संपुष्टात आले.
रामकुमार रामनाथनला या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश मिळाला होता. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील झालेल्या सामन्यात स्पेनच्या पेद्रो मार्टिनेजने रामकुमार रामनाथनचा 3-6, 7-5, 6-3 असा पराभव केला. हा सामना अडीच तास चालला होता. या लढतीत रामकुमारने पहिला सेट जिंकून मार्टिनेजवर आघाडी मिळवली होती पण त्यानंतर मार्टिनेजने पुढील दोन सेट्स जिंकून रामकुमारचे आव्हान संपुष्टात आणले.