Tarun Bharat

रामसहाय प्रसाद यादव नेपाळचे नवे उपराष्ट्रपती

वृत्तसंस्था  / काठमांडू

मधेशी नेते रामसहाय प्रसाद यादव यांची नेपाळचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. नेपाळच्या निवडणूक आयोगाने यासंबंधी घोषणा केली आहे. जनता समाज पक्षाचे रामसहाय प्रसाद यादव, सीपीएन-युएमएलच्या अष्टलक्ष्मी शाक्य, जनमत पक्षाच्या प्रमिला यादव आणि ममता झा यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविली होती.

रामसहाय यादव यांना नेपाळी काँग्रेसचे तीन प्रमुख सहकारी पक्ष सीपीएन-माओवादी सेंटर आणि सीपीएन-युनिफाइड सोशलिस्ट समवेत 7 पक्षांचे समर्थन प्राप्त होते. याचमुळे सहाय यांचा उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. नेपाळच्या दक्षिण तराई क्षेत्रात मधेशी समुदायाच्या लोकांची संख्या आहे. भारतीय वंशाच्या लोकांना नेपाळमध्ये मधेशी संबोधिण्यात येते.

Related Stories

वुहानच्या प्रयोगशाळेतून फैलावला नाही कोरोना!

Patil_p

बांगलादेशात शरणार्थी शिबिराला आग

Patil_p

जर्मनीत नियंत्रण

Omkar B

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Archana Banage

अमेरिकेने रद्द केली 1 हजारहून अधिक विमान उड्डाणे

Patil_p

रशियाचे संरक्षणमंत्री शोईगू गायब?

Patil_p