ऑनलाईन टीम/तरुण भारत
मातोश्रीवर जाण्याचा हट्ट आणि मुख्यमंत्र्यांविरोधात थोपटलेले दंड राणा दाम्पत्याला महागात पडलंय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना पोलिसांनीअटक केली आहे. खार पोलिसांनी (Khar Police) 153 अ कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (Rana couple arrested by police)
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबईतल्या खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर आज दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेलं. राणा दाम्पत्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, सुमारे १० तासांपासून चाललेल्या हायव्होल्टेज नाट्याला पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटलेल्या राणा दाम्पत्याचा शिवसैनिकांनी रस्ता अडवून धरला होता. अखेर प्रचंड मोठ्या पोलिस बंदोबस्तात मिस्टर अँड मिसेस राणांना खार पोलिस स्टेशनला आणण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांपासून वाचविण्यासाठी राणा दाम्पत्याला ज्या गाडीतून पोलिस स्टेशनला आणलं गेलंं.