Tarun Bharat

“प्रियंका गांधींकडून २ कोटींचं पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला”

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर (rana kapoor) यांनी ईडीसमोर (ED) एक मोठा खुलासा केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्याकडून एमएफ हुसेन यांचं पेंटिंग विकत घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, अशी माहिती फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार देण्यात आली आहे. तसेच या पेंटिंगमधून मिळालेली रक्कम गांधी परिवाराने न्यूयॉर्कमधील सोनिया गांधी (soniya gandhi) यांच्या उपचारासाठी वापरली होती, अशी माहितीही दिली आहे.

राणा कपूर ईडीसमोर म्हणाले, “तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा (milind deora) यांनी म्हटलं होतं की प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्याकडील पेटिंग खरेदी करण्यास नकार दिल्यास गांधी कुटुंबासोबत चांगले संबंध तयार करण्यास अडचण येईल. तसेच पद्मभूषण पुरस्कार मिळण्यातही अडसर येईल.”

“पेटिंगच्या खरेदीचे पैसे सोनिया गांधींच्या उपचारासाठी वापरले”
२ कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगून कपूर यांनी दावा केला की, मिलिंद देवरा यांनी नंतर त्यांना गोपनीयपणे सांगितले की विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबियांनी सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये वापरली. सोनिया गांधींचे जवळचे विश्वासू अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले होते की, सोनिया गांधींच्या वैद्यकीय उपचारासाठी योग्य वेळी गांधी कुटुंबाला मदत देऊन मी कुटुंबासाठी चांगले काम केले आहे, असे कपूर यांनी ईडीला सांगितले.

Related Stories

तांत्रिक कारणास्तव म्हाडाची परीक्षा रद्द; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

Abhijeet Shinde

बसपाची दहा छोट्या पक्षांसोबत युती

datta jadhav

आदितीचे पदक हुकले

datta jadhav

कराडवाडी गावच्या हद्दीत आढळला अनोळखी स्त्रीचा मृतदेह

Abhijeet Shinde

मोदींची आज मंत्रिमंडळासोबत बैठक; ‘या’ विषयांवर होणार चर्चा

datta jadhav

देशात 21 हजार 822 नव्या बाधितांची नोंद

Patil_p
error: Content is protected !!