तरुणभारत ऑनलाइन टीम
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट चा लग्नसोहळा थाटात पार पडला. या शाही विवाहाचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. आलिया -रणबीरच्या मेहंदी ,संगीत आणि लग्नानंतरच्या पार्टीचे नवे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.पण यामध्ये रणबीर आणि आलियाच्या मैत्रिणींचा एक फोटो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये रणबीर हातामध्ये एक कागद घेऊन उभा आहे.
आलिया ची जवळची मैत्रीण तान्या साहा गुप्ताने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोतआलियाच्या मैत्रिणींनी रणबीरला वेढलेलं आहे. त्याच्या हातातील कागदावर स्वाक्षरी दिसत आहे.ज्यावरून त्याने आपल्या मेहुण्यांशी काहीतरी करार केल्याचं दिसत आहे. रणबीरने कोणत्या अटी व शर्तींसाठी आपली स्वाक्षरी दिली आहे ते उघड झालं नाही,पण या मेहुण्या वरासोबत डॅशिंग पोज देताना दिसत आहेत. मेहुण्यांसोबत रणबीर देखील धम्माल मस्ती केली आहे. यात आलियाही तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहे.