Tarun Bharat

रणदीप गुलेरियांच्या सेवा कालावधीत वाढ

आणखी तीन महिने दिल्ली एम्स संचालकपदी कायम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा कार्यकाळ पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. आता ते सप्टेंबरपर्यंत संचालक म्हणून काम पाहतील. याबाबतची अधिसूचना उपसंचालक (प्रशासन) यांनी जारी केली आहे. संचालक गुलेरिया यांचा कार्यकाळ वाढविण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मार्चमध्ये कार्यकाळ वाढवण्यात आला होता.

डॉ. रणदीप गुलेरिया यांची 28 मार्च 2017 रोजी पाच वर्षांच्या कालावधीसाठी एम्सचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुलेरिया यांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपत होता. अशा स्थितीत संचालकपदासाठी विविध नावे चर्चेत होती. एम्सच्या निवड समितीने तीन नावांवर शिक्कामोर्तब करून ती केंद्राच्या नियुक्ती समितीकडे मंजुरीसाठी पाठवली होती. येथून ही यादी पंतप्रधान कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली. या यादीमध्ये एंडोक्रायनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निखिल टंडन, एम्स ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा ??आणि गेस्ट्रोएंट्रोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, यापैकी कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब न झाल्यामुळे विद्यमान संचालक डॉ. गुलेरिया यांचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता. संचालकपदासाठी पाठवण्यात आलेल्या तीन नावांबाबत पंतप्रधान कार्यालयाला विरोध झाल्याचेही एका अधिकाऱयाचे म्हणणे आहे. त्यामुळे या नावांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

Related Stories

ममतांच्या विरोधात भाजपचा ‘चक्रव्यूह’

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या आधीच सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश

prashant_c

पेगॅससच्या कंपनीशी कोणताही व्यवहार नाही

Patil_p

दर्जाहीन, सदोष टेस्टींग कीट परत करणार

Patil_p

मध्य प्रदेश : मंत्री विश्वास सारंग यांना कोरोनाची लागण

Rohan_P

यूपी : इटावा सफरीमध्ये कोरोनाचा शिरकाव!

Rohan_P
error: Content is protected !!