वार्ताहर /बाळेकुंद्री
बाळेकुंद्री खुर्द व परिसरातील पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी, मारिहाळ, हुदली, व हन्नीकेरी भागात मंगळवारी रंगपंचमी जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात आली. विविध रंगांच्या उधळणीत, डॉल्बीच्या तालावर नाचणारे बालचमूसह युवक. उत्साही तरुणी व महिलांचा या रंगपंचमीत सहभाग झाला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास बाळेकुंद्री कामण्णा गल्लीतील होळीदहनानंतर रंगपंचमीची सांगता करण्यात आली. बाळेकुंद्री गावासह मारिहाळ पेठ गल्लीत, सुळेभावी शिवाजी चौक व मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे फवारे लावून नृत्यात दंग झालेली तरुणाई रंगाची मुक्त उधळाण करीत होते. बालचमू एकमेकाला रंग फासत रंगपंचमीचा शुभेच्छा देत होते.