21 जानेवारीला होणार प्रकाशन
अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री राणी मुखर्जीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. स्वतःचा आवाज अन् अभिनयाने राणी मागील 23 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान टिकवून आहे. परंतु आता ती फारच कमी चित्रपटांमध्ये काम करत आहे. राणी स्वतःच्या जीवनाशी निगडित अनेक रंजक गोष्टी आणि रहस्यांची उकल चाहत्यांसमोर करणार आहे. अभिनेत्री आता लवकरच स्वतःचे आत्मचरित्र घेऊन येत आहे.
राणी मुखर्जीच्या या आत्मचरित्राची माहिती प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानीने दिली आहे. अभिनेत्री लवकरच चित्रपटसृष्टीसह स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना स्वतःच्या आत्मचरित्रात उतरविणार असल्याचे भयानीन सांगितले आहे. राणीचे हे आत्मचरित्र पुढील वर्षी तिच्या जन्मदिनी प्रकाशित केले जाणार आहे. अभिनेत्री 21 मार्च रोजी हे पुस्तक सादर करणार आहे.
राणी मुखर्जीची लव्ह लाइफ अत्यंत चर्चेत राहिली आहे. आदित्य चोप्रासोबत विवाह होण्यापूर्वी राणीचे नाव गोविंदासोबत जोडले गेले हेते. राणी मुखर्जी अन् गोविंदा यांच्यातील कथित रिलेशनशिपमुळे सुनीता आहुजा अन् गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यावर संकट ओढवले होते असे बोलले जाते. राणीने 2014 मध्ये दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोप्रासोबत विवाह केला होता. दोघांनाही अदिरा नावाची एक मुलगी आहे.