वार्ताहर /सांबरा
निलजी येथील रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूलचा विध्यार्थी अनिकेत गोमाण्णाचे याने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बांबू उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडाशिक्षक एन व्ही आपटेकर व इतर शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर आणि संचालक तसेच मुख्याध्यापक वाय.पी.पावले यांनी त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.