वार्ताहर /म्हार्दोळ
वेलिंग प्रियोळ पंचायतीच्या सरपंचपदी रणजीत प्रभूदेसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच लक्ष्मीकांत खेडेकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.
सरपंच पदासाठी काल सोमवारी सकाळी निवडणूक झाली. यावेळी रणजीत प्रभूदसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी त्यांचे समर्थक उपसरपंच दिक्षा नाईक, पंचसदस्य हर्षा गावडे, संजना गावडे, रोहिणी नाईक व मंगेश गावडे हे अकरापैकी सहा सदस्य उपस्थित होते. रणजीत प्रभूदेसाई हे स्थानिक आमदार तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे समर्थक आहेत.