किणये : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित रणकुंडये येथील महषी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलच्या मुलांच्या हॉलीबॉल संघाची जिल्हापातळीवर निवड झाली आहे. नुकत्याच मोदगे येथे झालेल्या तालुका पातळीवरील स्पर्धेत रणकुंडये हायस्कूलच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला असल्यामुळे त्यांची ही निवड झाली आहे.
या संघात गणेश पाटील, ज्योतिबा कोलेकर, अनिकेत पाटील, मंथन पाटील, अनिकेत ब पाटील, सलील पठाण ,मलिकरियान सय्यद ,साई हजगोळकर, आदर्श पाटील ,साईश पावसे ,सुमित पाटील ,नेहाल तशिलदार यांचा समावेश आहे.
आंबेवाडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक जे .वाय. पाटील यांनी या विद्यार्थ्यांसाठी हॉलीबॉल किट देणगी स्वरूपात दिलेला आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका आर. एल. पाटील क्रीडा शिक्षक एम. के. पाटील व इतर सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.