बेळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा : तनिष्का, श्रावणी, सप्तक, सिद्धार्थ, माहिम, वृषांक ऐश्वर्याही अजिंक्य
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित बीडीबीए चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत रनवीर मोहिरे, गगन, आदित्य असुंडी, अर्णा असुंडी, माहिम गाडवी, वृषांक, तनिष्का कोरीशेट्टी, श्रावणी मायगूर, आदित्य शिगनमुखी, सात्वीक पोतदार, ऐश्वर्या टी., शीया, आची, सिद्धार्थ अप्पुगोळ, ऐश्वर्या टी. यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजेतेपद पटकाविले.
महाबळेश्वर नगर येथील बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत रनवीर एम. व गगन आर. यानी आर्यन व नक्षत्र यांचा 2-0 तर दुसऱया उपांत्य सामन्यात हार्दिन, साईश व नमन यांनी अद्वैत व प्रितम यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात गगन व रनवीर मोहिरे यांनी हार्दिन असुंडी व साईश रेवणकर व रमण हसबे यांचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अलरिना, सीया, शायन यांनी जीना व अवनी यांचा 2-0 तर अदिती, अर्णा, शान्वी यांनी अशिता, त्रिवेणी यांचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात अदिती असुंडी, अर्णा असुंडी व शानवी पाटील यांनी अल्ड्रीना अंतोनी, सीया व सायोन मंगल्स यांचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
15 वर्षाखालील मुलांच्या गटात माहिम, वृषांक यांनी साईश व अक्षय यांचा 2-0 तर प्रितम, लक्ष व तोषान यांनी तनुष, अथर्व यांचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत माहिम गाडवी, वृषांक यांनी लक्ष राव, प्रितम कानिटकर, तोषान मंगल यांचा 2-0 असा पराभव केला. मुलींच्या गटात अदिती, अर्णा, श्रावणी यांनी जान्हवी, सृष्टी व रिद्दीमा यांचा 2-0 तर तनिष्का, श्रावणी, श्रेया यांनी शानवी व किनी यांचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्का कोरिशट्टी, श्रावणी मायगूर व श्रेया चिन्नाळ यांनी आदित्य असुंडी, अर्णा असुंडी, श्रावणी एम यांचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
17 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत आदित्य, रणवीर व सप्तक यांनी लक्ष, अहिल व प्रितम यांचा 2-0 तर दुसऱया सामन्यात अथर्व एच.-ओम के. यांनी माहिम, वृषांक व रविनंदन यांचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आदित्य शिंगनमुखी, सप्तक पोतदार, रणवीर मोहिरे यांनी अथर्वा हुबलीकर व ओम कळसण्णावर यांचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात श्रेया, भक्ती, बाणाश्री यांनी केना, शानवी, रू यांचा 2-0 असा तर दुसऱया सामन्यात ऐश्वर्या, सीया व साची यांनी सुची, धवणी यांचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ऐश्वर्या, सिया व साची यांनी श्रेया चिन्नाळ व भक्ती बानश्री यांचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
पुरूष एकेरीत उपांत्य सामन्यात सिद्धांत ए. ने ओम एलिगारचा 21-16, 18-21, 26-24, तर दुसऱया सामन्यात आदित्य शिंगनमुखीने सुजयचा 21-13, 21-14 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिद्धार्थ अप्पुगोळने आदित्य शिंगनमुखीचा 21-12 21-16 असा पराभव करून तर महिलांच्या गटात उपांत्य सामन्यात रिया हिने तनिष्का के.चा 22-20 22-20 तर दुसऱया सामन्यात ऐश्वर्या टी.ने नताशाचा 21-12 21-10 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ऐश्वर्या टी.ने रिहा मंथेरोचा 21-18 14-21 24-22 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बीडीबीआयचे सचिव अशोक पाटील, आनंद हावण्णावर, मनोज पाटील, अजय असुंडी, एस. एम. हुन्नरगीकर व प्रमुख पंच भूषण अणवेकर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीडीबीआयच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.