9 सुवर्ण, 16 रौप्य व 4 कांस्य पदकांची कमाई
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचा घटक असलेल्या काकती येथील राव युवा अकॅडमीच्या तायक्वांदोपटूंनी बेंगळूर येथील अशोक कन्वेंशन हॉलमध्ये दि. 2 व 3 जुलैला वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशनच्या नियमानुसार झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर व सीनियर तायक्वांदो स्पर्धेत सुयश प्राप्त केले.
युआयएफए तायक्वांदो इंडिया आणि एओटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगना, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड, पं. बंगाल, बिहार व दिल्ली येथून 1600 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत बेळगावच्या राव युवा अकादमीच्या वेदांत खडबडीने पुमसेमध्ये रौप्य तर क्मयोरूगीमध्ये सुवर्ण, मोहम्मदशफी लतीफशहा चांदशहाने पुमसेमध्ये व क्मयोरूगीमध्ये सुवर्ण, धैर्य जयंतीलाल पटेलने पुमसेमध्ये रौप्य तर क्मयोरूगीमध्ये कांस्य, मोहम्मदशफी लतीफशहा चांदशहाने पुमसेमध्ये रौप्य तर क्मयोरूगीमध्ये कांस्य, गगन शिवपुजीमठने पुमसेमध्ये रौप्य तर क्मयोरूगीमध्ये कांस्य, जाफरसादिक बाबू पाच्छापुरेने पुमसे व क्मयोरूगीमध्ये रौप्य, पवनराज बसवराज दड्डीकरने पुमसेमध्ये सुवर्ण तर क्मयोरूगीमध्ये कांस्य, सिद्धार्थगवडा विरंगवडा गौरीने पुमसेमध्ये रौप्य तर क्मयोरूमीमध्ये सुवर्ण, आरूष अभय टूमरीने पुमसे व क्मयोरूगीमध्ये रौप्य, सानवी सागर पाटीलने पुमसे आणि क्मयोरूगीमध्ये सुवर्ण, जिया सतीश पुजारीने पुमसेमध्ये रौप्य तर क्मयोरूगीमध्ये सुवर्ण, त्रिवेणी बावकांना बडकनवरने पुमसेमध्ये रौप्य, श्रीराज राजेश पाटीलने पुमसेमध्ये सुवर्ण तर क्मयोरूगीमध्ये रौप्य, जितेश सतीश पुजारीने पुमसेमध्ये रौप्य पदक पटकावले.
या खेळाडूंना प्रशिक्षक श्रीपाद राव, राजेश पाटील, राजाराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.