वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमधील आमदार एल्थोस कुन्नपल्ली यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यावर काँग्रेस पक्षाने त्यांना 6 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. आमदाराकडून याप्रकरणी मिळालेले स्पष्टीकरण समाधानकारक नव्हते आणि 6 महिन्यांसाठी प्रदेश काँग्रेस समिती आणि जिल्हा काँग्रेस समितीचे त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वर्तन करण्यास ते अपयशी ठरल्याचे पक्षाकडून म्हटले गेले. एका महिलेने अलिकडेच पेरुंबवूरचे आमदार कुन्नपल्ली यांच्या विरोधात बलात्कार तसेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. स्वतःच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यावर कुन्नपल्ली हे फरार झाले हेते. आमदाराने शनिवारी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजेरी लावली होती. पीडितेचे नाव जाहीर केल्याप्रकरणीही या आमदाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्ह नोंदविला आहे.