नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. येथील रेल्वेस्थानकावर एका 30 वषीय महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेच्या विद्युत विभागात काम करणाऱया चार कर्मचाऱयांवर सामूहिक बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. संशयितांनी महिलेला अत्यंत वाईट पद्धतीने अडकवून तिच्यावर अत्याचार केले. सध्या पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पीडित महिलेने पहाटे अडीच वाजता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. शोध घेतल्यानंतर पीडित महिला नवी दिल्ली रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वर पोलिसांना सापडली. सदर महिला गेल्या एक वर्षापासून आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे आणि त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी महिलेची एका मित्राच्या माध्यमातून रेल्वेत काम करणाऱया एका कर्मचाऱयाशी ओळख झाली होती. सदर कर्मचाऱयाने आपल्या सहकाऱयांच्या मदतीने अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून महिलेसोबत गैरवर्तन करणारे चारही आरोपी रेल्वेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी आहेत. सर्वांना अटक करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आल्याचे रेल्वे पोलीस विभागाचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले.