Tarun Bharat

विवाहित महिलेवर घरात घुसून अतिप्रसंग

प्रतिनिधी/अक्कलकोट

तालुक्यातील २४ वर्षीय विवाहित तरूणीचा बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत अतिप्रसंग केल्याची घटना घडली. आरोपी जाविद गुलाब ताशेवाले (रा. बोरगाव दे.) याच्यावर येथील अक्कलकोट उत्तर ठाणे मध्ये भादवि कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.

संशयित आरोपी फरार असून याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी झोपली असताना आरोपी जाविद गुलाब ताशेवाले याने तु मुझे बहोत अच्छी लगती है असे म्हणत पिडीतेच्या अंगाशी झोंबाझोंबी करू लागला. त्यावेळी पीडितेने विरोध केला असता बळजबरीने अतिप्रसंग केला, अशी माहिती फिर्यादीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अधिक तपास एपीआय महेश भावीकट्टी हे करीत आहेत. आरोपीचा मोबाईल बंद असुन ते लोकेशन ट्रक वरटाकले आहे. पिडीतेचा पती व भाऊ नाटक पाहण्यासाठी गेले होते. सासु बाहेर पडवीत झोपली होती. पिडीत घरात असताना आरोपीने दार वाजविले. नवरा असेल म्हणून पीडितेने दार उघडले असता आरोपीने अतिप्रसंग केला, अशी माहिती तपास अधिकारी भावीकट्टी यांनी दिली.

Related Stories

एप्रिलमध्ये 142 महिलांच्या हाती लालपरीचे स्टेरिंग

Archana Banage

सोलापूर : सुस्त प्रशासन हतबल जनता, लसीसाठी डॉक्टरांना घेराव…

Archana Banage

सोलापुरात एकाच दिवशी 21 नवीन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले

Archana Banage

९० वर्षाचे आजोबा अन १ वर्षाच्या बाळासह ५ जणांना सोडले घरी

Archana Banage

सोलापूर : जितेंद्र पवार, दत्तात्रय सावंत यांचा स्टिकर लावून १०० मीटरच्या आत केला प्रचार

Archana Banage

Solapur : बारा लाख जनावरांचे होणार लसीकरण

Abhijeet Khandekar