दक्षिण आफ्रिकेतील अंगोला या देशात 170 कॅरेट वजनाचा एक अतिदुर्मीळ गुलाबी हिरा खाणीत सापडला आहे. गेल्या 300 वर्षात इतका मोठा गुलाबी हिरा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याची किंमत किती येईल, याविषयी बरीच अनुमाने व्यक्त करण्यात आली आहेत. पण ती 3000 कोटी रुपयांपेक्षा कमी असणार नाही, यावर हिरेतज्ञांचे एकमत आहे. काही दिवसांपूर्वीच अंगोला येथील एका फारशा प्रसिद्ध नसलेल्या खाणीत खनन कर्मचाऱयांना तो आढळून आला.
‘द लुलो रोज’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. लुकापा डायमंड कंपनी ही या हिऱयाची मालक असून कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. या हिऱयाचा शोध ऐतिहासिक मानला जात आहे. तो ‘टाईप IIa’ या श्रेणीतील असून या श्रेणीतील हिरे सर्वात शुद्ध मानले जातात.
2018 मध्ये एका अत्यंत जुन्या गुलाबी हिऱयाचा लिलाव करण्यात आला होता. त्याची 400 कोटी रुपये किंमत मिळाली होती. त्या हिऱयाचा शोध रशियातील खाणीत लागला होता. त्या हिऱयाला निसर्गाचा चमत्कार असे नामोनिधान प्राप्त झाले होते. त्याचे वजन 19 कॅरेट होते. आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक गुलाबी हिरे सापडलेले आहेत. त्या देशातील अर्जेल ही खाण गुलाबी हिऱयांसाठी प्रसिद्ध आहे. ‘द लुलो रोज’ या हिऱयाचा लिलाव अंगोला सरकारच्या स्वामित्वात असलेल्या सोडियम नामक हिरा व्यापार कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याआधी या हिऱयाला पॉलिश केले जाणार आहे.