तरुण भारत

भारतात पहिल्यांदाच आढळला सोलापुरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा खोकड

सोलापूर/अक्कलकोट-भारतात पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा खोकड आढळून आला. हा खोकड सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आढळून आला. पांढऱ्या रंगाची खोकड असलेली नोंद भारतात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध वन्यप्राणी आढळतात. यामध्ये लांडगा, कोल्हा तसेच खोकड अश्या प्राण्यांचा वावर आहे. अक्कलकोट तालुक्यातील माळरानावर अतिशय दुर्मिळ लुसिस्टिक खोकड पहिल्यांदाच आढळला आहे.

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी, ह्यास Indian Fox इंडियन फॉक्स या नावाने सुद्धा ओळखला जातो. खोकड हा राखाडी तांबूस रंगाचा प्राणी आहे परंतु यावर्षी निरीक्षण करत असताना पांढऱ्या रंगाचा खोकड (Fox) दिसून आला. ल्युसिस्टिक असलेला हा खोकड संपूर्णतः पांढरा असून शेपटीच्या टोकास काळा रंग आहे ,असे दिसून आले. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात ल्युसिस्टिक रानमांजर व कोल्ह्याची नोंद झाली होती,पण पांढऱ्या खोकडची ही भारतातील पहिलीच नोंद आहे. खोकडाच्या पांढऱ्या रंगाच्या दिसण्याचे कारण म्हणजे अनुवांशिक उत्परीवर्तन/दोष (Genetic Mutation) होय. यामध्ये अनेक रंगांच्या रंगद्रव्यांच्या आंशिक किंवा संपूर्ण अभाव असतो. ल्युसिस्टिक खोकड हे पूर्णपणे पांढरे असून पाय, चेहऱ्यावर किंवा पाठीवर गडद खुणा दिसून येतात. खोकड हा प्रामुख्याने माळरानात, शेतात व खुरट्या झुडुपांच्या प्रदेशात आढळतो. आकाराने खोकड हा कोल्ह्यापेक्षा लहान असून लांबी 50 ते 60 सेमी इतकी असते, शरीराचा रंग राखाडी तांबूस असतो. दिसायला सडपातळ व लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येतो.

Advertisements

खोकड हे जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडावर बिळ करून राहतात. सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोर व पक्षी हे त्यांचे मुख्य खाद्य होय तसेच उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवत असल्यामुळे खोकड हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.
शिवानंद ब. हिरेमठ
(सदस्य, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर)

Related Stories

हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

datta jadhav

माकपच्या आंदोलकांना पोलिसांनी नेले फरफटत

Abhijeet Shinde

बंगाल विधानसभेत जोरदार हाणामारी

Abhijeet Shinde

सोलापूर : सोयाबीन काढणी मजुरांची फसवणूक, ठेकेदारांविरोधात वैराग पोलिसात तक्रार दाखल

Abhijeet Shinde

यात्रा करा नाहीतर…, खासदार राऊतांचे जन आशीर्वाद यात्रेवर टिकास्त्र

Abhijeet Shinde

दिलासा! तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

datta jadhav
error: Content is protected !!