. . .शकुन गे माये सांगताहे
(शकून-अपशकून विचार भाग-1)
मांजर आडवं गेलं किंवा पाल चुकचुकली अशासारख्या घटनांबाबतीत या लेखात माहिती देण्याचा हेतू नाही. लेखाच्या शेवटी मात्र काही शकुनांच्याबाबतीत बोलेन हे नक्की. दुचाकीस्वार एक वेळ सिग्नल मोडतील पण समोरून येणाऱया दुचाकीस्वाराचा गाडीचा स्टँड जर लागलेला असेल तर ते तसे त्याला सांगायला विसरणार नाहीत! का? कारण वळण घेताना त्यात दुचाकीस्वाराचा अपघात होऊ शकतो, हा त्यामागचा हेतू. म्हणजे समोरच्या दुचाकीस्वाराचा दृष्टीने तो एक शकूनच ठरला ना? संपूर्ण ब्रह्मांड ज्या विविध अणुरेणुंनी बनले आहे त्याच अणुरेणूनी आपला देहही बनला आहे. म्हणजे वस्तुतः आपण सर्व, पशु, पक्षी, वस्तू, झाड, फुलं इत्यादी सर्व एका अर्थी जोडले गेलेले आहोत. सुरुवातीला जे उदाहरण दिले त्याप्रमाणे शकुन आणि अपशकुन ही ब्रह्मांडाची तुमच्याबरोबर पुढे घडणाऱया घटनांबाबत इशारा देण्याची पद्धत आहे असे म्हणता येईल. फक्त ती भाषा आपल्याला कळली पाहिजे. जे शकुन-अपशकुन आपल्या समाजात रूढ आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांड तुम्हाला काय सांगते आहे हे ओळखता आले पाहिजे. हे ब्रह्मांडाचे आपल्याला सांगणे पशू, पक्षी आणि घटना या माध्यमातून होत असते. ब्रह्मांडाची भाषा म्हणजे शकून-अपशकून! हे समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. बऱयाच वर्षापूर्वी जेव्हा जुन्या घरी राहत होतो तेव्हा एक महिला तिच्या नवऱयाबद्दल प्रश्न विचारायला आली होती. माझे घर जुने होते. घराच्या बाजूला एक विहीर होती आणि एक व्यक्ती विहिरीतून पाणी काढत होती. महिलेचा प्रश्न होता की तिच्या नवऱयाला अटक होण्याची शक्मयता आहे, तर काय होईल? इतक्मयात बाजूच्या विहिरीतून कळशी पडण्याचा आवाज आला. कोणतीही पत्रिका न मानता मी तिला सांगितले की तुझ्या नवऱयाला काही होणार नाही. तो घरीच राहील. अटक होईल असे वाटेल पण होणार नाही. झालेही तसेच. त्यावेळी शकुन असा घडला होता की विहिरीतले पाणी विहिरीतच परत गेले. व्यक्ती आपल्या कुटुंबातच राहणार! म्हणजे निसर्गाने एका तऱहेने पूर्वसूचना दिली. ही पूर्वसूचना म्हणजेच शकुन. समजा त्या बाईने प्रश्न विचारला असता की माझे अमुक अमुक काम होईल का तर मी उत्तर दिले असते की ते होताहोता राहील, काम होणार नाही. असे का तर घागर अगदी वर आलेली असताना खाली पडली याचा अर्थ हातातोंडाशी आलेला घास जाणार! अशी शकुनाची गंमत असते.
महा उपायः नजर लागणे.. लहान मुलांबरोबरच मोठय़ांनाही लागू होते. नजर लागणे म्हणजे एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी दुसऱया व्यक्तीला त्रास देते. यावर सोपा उपाय म्हणजे काळय़ा शाईने मानेच्या ठिकाणी ओमकार काढणे.
सोपी वास्तु टिपः वास्तूमध्ये आजारपण जर जास्त असेल तर नैर्त्रुत्येच्या कोपऱयात चुकूनसुद्धा अन्नपदार्थ ठेवू नयेत.
मेष
संमिश्र ग्रहमान आहे. या काळामध्ये तुमचे स्वतःकडे लक्ष जास्त असेल. त्याचबरोबर स्वभाव थोडा हट्टी होऊ शकतो. स्थावर मालमत्ता, वाहन आणि गुंतवणूक या बाबतीत ग्रहमान चांगले आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना कष्ट जास्त घ्यावे लागतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. नोकरदार वर्गाला मात्र कामाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
उपायः पाच कवडय़ा जवळ ठेवा
वृषभ
मसालेदार किंवा तिखट खाण्याचा त्रास होऊ शकतो. तब्येतीची विशेष काळजी घेणे श्रेयस्कर ठरेल. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कागदोपत्री व्यवहार पूर्ण होतील. प्रवासाचे योग आहेत. जमिनीचा व्यवहार मनासारखा झाल्यामुळे आनंद होईल. शेअर्ससारख्या धोकादायक गुंतवणुकीमध्ये पैसा गुंतवू नका. मित्रांकडून लाभाचे योग होत आहेत.
उपायः गणपतीला जास्वंदाचे फुल अर्पण करा
मिथुन
तब्येत उत्तम राहील. धन प्राप्तीच्या बाबतीत येणारा काळ सुंदर असेल. भावंडांशी मतभेद संभवतात. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांमध्ये आनंद प्राप्ती होईल. नोकरदार वर्गाला वरि÷ांकडून बोलणी खावी लागतील. हाताखालील लोकांना हुशारीने वागवले तर कामे लवकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. भाग्योदयाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.
उपायः सायंकाळी तुपात भिजवलेला कापूर जाळावा.
कर्क
सध्या तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आहे. धनप्राप्तीच्याबाबतीत मिळालेल्या संधींचा योग्य तो फायदा उचला. कौटुंबिक वातावरणात मधुरता असेल. घरातील एखादा सदस्य अपेक्षित बातमी कळवेल. प्रवासातून थोडे नुकसान संभवते त्यामुळे प्रवास पुढे ढकललेला बरा. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत काम करणाऱयांना अपेक्षा पूर्ण न झाल्याने थोडे वाईट वाटू शकते. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपायः मंगळवारी देवीला कुंकुमार्चन करावे
सिंह
कामे धडाडीने पूर्ण कराल या काळात काम करण्याचा वेग वाढेल. आर्थिक आवक मात्र मनासारखी होणे कठीण आहे. घरात लहानसहान गोष्टींमुळे वाद होऊ शकतो. कागदोपत्री व्यवहार करत असताना सावध राहणे गरजेचे आहे. धोकादायक गुंतवणूक कोणत्याही परिस्थितीत टाळा. याकाळात पैसे उसने दिल्यास परत मिळणे कठीण असेल. नोकरदार वर्ग कामाचा व्याप वाढल्याने कंटाळून जाईल. वैवाहिक जोडीदाराशी भांडण टाळा.
उपायः सूर्याला अर्ध्य द्यावे
कन्या
जिभेवर नियंत्रण ठेवा कारण चुकीच्या खानपानांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने सध्या संयमाने वागले पाहिजे. गुंतवणुकीच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. कलाकार आणि खेळाडूंना अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जोडीदारामुळे नुकसानापासून वाचाल. या काळात खर्चांवर आवर घालणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांची थेट होईल.
उपाय : आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र घालून आंघोळ करावी
तूळ
आरोग्याच्या दृष्टीने येणारा काळ हा थोडा त्रासदायक ठरू शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. कागदोपत्री व्यवहारात चुका होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टी आणि वाहन यांच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. कोणतीही गुंतवणूक करत असताना चार चौघांचा सल्ला घ्यायला विसरू नका. नोकरदार वर्गाला चांगली बातमी कळेल. व्यावसायिकांना फायद्याचे योग होत आहेत. वैवाहिक जीवनात थोडे मतभेद संभवतात.
उपायः सात पिवळय़ा कवडय़ा जवळ ठेवाव्या.
वृश्चिक
येणारा काळ हा नावलौकिक आणि प्रति÷ा वाढवणारा असेल. तुमच्या कष्टांचे चीज होईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. धनप्राप्ती करताना संघर्ष करावा लागेल. प्रवासाची शक्मयता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. प्रेमसंबंध मधुर होतील. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराबरोबर वाद-विवाद होण्याची शक्मयता आहे. धार्मिक स्थळाला भेट द्याल. कुसंगत टाळावी.
उपाय ः गणपतीला लाल गुंजा अर्पण करा
धनु
खानपान आणि पथ्य याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या चुकीमुळे तब्येत बिघडण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत लहानसा समारंभ साजरा कराल. धनप्राप्ती उत्तम असेल. या काळात पैसे साठवण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी, वाहन यांच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. गुंतवणूक करण्याआधी त्यातील धोके समजून घ्या. हाताखालील लोकांचा त्रास होईल. कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून सावध राहण्याची गरज आहे.
उपाय ः हनुमानाला बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा
मकर
या काळात भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. मनात नकारात्मक विचार जास्त येऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींची म्हणावी तशी साथ मिळणे अवघड दिसते. प्रवासाचे उत्तम योग आहेत. कागदपत्रे व्यवहारात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार सध्या टाळावेत. धोकादायक गुंतवणूक टाळा. शत्रु नामोहरम होतील. वैवाहिक सुखात भर पडेल. व्यावसायिक जोडीदाराची साथ चांगली असेल. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत.
उपायः उडीद दान द्यावे.
कुंभ
धनप्राप्तीच्या दृष्टीने सध्याच्या काळात तुम्ही नशीबवान आहात. कौटुंबिक सुख प्राप्त होईल चांगल्या खाण्यापिण्याकडे कल असेल. पण कुपथ्य केल्याने तब्येत घडू शकते. प्रवास सध्या टाळलेला बरा. आपला मुद्दा समोरच्याला पटवून देताना दमछाक होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे पण त्याचबरोबर शत्रूच्या कारवायांकडे बारीक लक्ष ठेवा. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपायः तुरटीने दात घासावे.
मीन
तब्येतीची काळजी दूर होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. पैशांच्या बाबतीत थोडे सावध रहा कारण काही व्यक्ती दिलेले वचन मोडू शकतात. कुटुंबातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवास टाळा. सही करताना सावध राहा. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट संभवते. वैवाहिक जीवनात थोडा कलह असेल. मैत्री संबंधातून फायदा होईल.
उपाय ः लाल वस्त्र दान द्यावे.