09-11-2022 ते 15.11.2022 पर्यंत
. . .शकुन गे माये सांगताहे , (शकून-अपशकून विचार भाग – 2)
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे कामाच्या निमित्ताने परगावी असताना एका परिचित व्यक्तीचा फोन आला आणि तिने विचारले कि मला नोकरी कधी मिळेल? हाती पंचांग किंवा कांप्यूटर नसताना किंवा त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण माहीत नसताना किंवा प्रश्नकुंडली न मानता कसे उत्तर द्यावे असा विचार करत असताना समोर टाईम्सचा एसेंट (नोकरी विशेषांक) दिसला आणि त्या माणसाला बिनधास्त सांगितले की नोकरी मिळणार आणि लवकरच मिळणार. काही दिवसांनी परत त्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने सांगितले की त्याला नोकरी मिळाली. आणखीन एक उदाहरण सांगतो. एका मित्राच्या लग्नाला बरीच वर्षे होऊन गेली तरी संतती होत नव्हती. घरी आलेला असताना तो वैतागून म्हणाला “जरा पत्रिका बघून सांग तरी, नशिबी मुल तरी आहे की नाही?’’ इतक्मयात डोअरबेल वाजली आणि तिरुपतीचा प्रसाद पोस्टाने आला. मी त्याला म्हणालो “भावा, यावषी तुझा नंबर नक्की लागणार यात शंकाच नाही!’’ आणि झालेही तसेच. शकून अपशकून हा विषय अगदीच जिव्हाळय़ाचा आहे. काही लोक याला पूर्णपणे अंधश्रद्धा मानतात तर काही लोक याला अतिमहत्त्व देतात. आज सुद्धा मांजर आडवे गेले की थोडा वेळ थांबून पुढे जाणारे लोक तुम्ही पाहिले असतील. किंवा पाल चुकचुकली की असे होणार तसे होणार असे म्हणणारे लोक आहेत. पाल अंगावर पडली की काहीतरी अशुभ होणार असे मानणारे आहेत. आपण अशा वातावरणातच वाढते गेलेलो आहोत. मग या शकुन शास्त्रामागचा नक्की काय विचार आहे किंवा हे खरोखर असते का आणि जर असेल तर हे कसे काम करते हे सांगण्याचा हा छोटा प्रयत्न आहे. बरे हा प्रकार फक्त भारतातच घडतो का? अजिबात नाही जगभरामध्ये जितक्मया संस्कृती आहेत त्या संस्कृतींमध्ये त्या संस्कृतीमधील जास्तीत जास्त संस्कृती त्याच्यावर विश्वास ठेवतात. इंग्रजीत याला ओमेन हे नाव आहे. गूड ओमेन्स शुभशकुन आणि अशुभ शकुन म्हणतो त्यावर बऱयाच देशांमध्ये विश्वास ठेवला जातो. चायनीज आणि कोरियन संस्कृतीमध्ये नंबर चारला टेट्रा फ़ोबिया असे म्हणतात म्हणजे चार नंबर हा भांडणाचा किंवा काहीतरी अशुभ घटना घडण्याचा संकेत देतो असे त्यांचे मत आहे. ब्लॅक फ्रायडे किंवा शुक्रवारी 13 तारीख येणे हे बऱयाच देशांमध्ये अशुभ मानले गेले आहेत. घरात असताना छत्री उघडणे हे बऱयाच युरोपीयन देशात अशुभ मानतात. आपल्या देशामध्ये वराहामिहिरासारख्या ज्योतिषशास्त्रातल्या प्रकांड पंडितानी सुद्धा शकुन विचार केला आहे.
महा उपायः वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असेल तर मंगळवारी मारुती मंदीरात 5 वातींचा दिवा लावावा.
सोपी वास्तू टिपः पैसे अडकणे ही एक मोठी समस्या आहे. आपण एखाद्याला विश्वासाने पैसे देतो किंवा माल/वस्तू देतो आणि समोरचा उधारी करून गायब होतो! याला वास्तू दोष सुध्दा कारणीभूत असू शकतो. उत्तर, उत्तर-पुर्व (इशान्य) भागात लाल रंग, स्वयंपाकघर, छतावरची पाण्याची टाकी , संडास जर असेल तर हमखास ही समस्या होताना पहिली आहे. याच बरोबर दक्षिण-पूर्व (आग्नेय ) भागात काळा/ निळा रंग, छतावरची पाण्याची टाकी , संडास असेल तरीही असे होते. यावरचा उपाय पुढच्या वेळी सांगतो!
मेष
या काळामध्ये आत्मविश्वासात थोडी कमी येऊ शकते. निर्णय घेताना सावध राहावे. कर्ज मिळण्याकरता प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. घरी अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. आर्थिक बाबतीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील वाद बाहेर जाऊ देऊ नका. गुंतवणुकीकरता अनुकूल वेळ आहे. नोकरदार वर्गाने वरि÷ांची मर्जी राखावी. ज्यांना परदेशगमनाची इच्छा आहे त्यांना संधी मिळतील.
उपाय– लाल गायीची सेवा करावी.
वृषभ
एखादा छोटा मोठा आजार असेल आणि तुम्ही जर स्वतः त्यावर इलाज करत असाल तर तब्येतीची हानी होऊ शकते त्यामुळे योग्य डॉक्टरला दाखवून इलाज करून घ्यावा. बऱयाच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्मयता आहे, प्रयत्न सोडू नये. कामाच्या ठिकाणी एखाद्या माणसाकडून विश्वासघात होऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत. प्रॉपर दिशा बाबतीत भाग्यवान असाल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
उपाय– मंदिरातील तीर्थ घरी ठेवावे.
मिथुन
भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थितीबद्दल तक्रार करून चालणार नाही. कौटुंबिक समाधान आणि कुटुंबातील व्यक्तींकडून सहयोग प्राप्त होईल. धनप्राप्तीसाठी प्रयत्न केले तर ते यशस्वी होतील. प्रवासातून धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या बाबतीत निर्णय घेताना सावध रहा. गुंतवणूक सध्या टाळावी. कामामध्ये चूक झाल्याने वरि÷ांची बोलणी खावी लागू शकतात. गाडी चालवताना सावध राहावे.
उपाय– श्रीगणेशाला दुर्वांची माळ अर्पण करावी.
कर्क
एखाद्या मित्राच्या मदतीने व्यवसायात लाभ होऊ शकतो. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. धनलाभ उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्ती एकत्र येण्याचा आनंद घेतील. प्रवास शक्मयतो टाळावा. कागदोपत्री व्यवहारात सावध राहावे. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक करू नका. वैवाहिक जीवन उत्तम असेल. व्यावसायिकांना उत्तम काळ आहे. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग आहेत.
उपाय– सोमवारी अनुदान करावे.
सिंह
आपला आनंद इतरांशी वाटल्याने द्विगुणित होईल. या काळात आत्मविश्वास प्रबळ असेल. आरोग्याची उत्तम साथ लाभेल. येणाऱया काळामध्ये अंदाज चुकल्याने धनहानीची शक्मयता आहे. आपल्या रागावर कंट्रोल ठेवा. अरेरावी स्वभावामुळे कुटुंबातील व्यक्तींची मने दुखावली जाऊ नयेत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीसंबंधी निर्णय पुढे ढकलले तर फायदा होईल. अहंकारामुळे प्रेमसंबंधात ताण येऊ शकतो. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे.
उपाय– सूर्याला अर्ध्य द्या.
कन्या
रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱयांना उत्तम संधी प्राप्त होतील. नोकरदार वर्गाने वेळेवर जबाबदारी पूर्ण केल्याने त्यांना बोनस किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते. या काळात खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे त्यांच्या साठी उत्तम काळ आहे. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. वैवाहिक जोडीदार योग्य वेळी साथ देईल. खोटय़ा गुंतवणुकीतून फायद्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धी होईल.
उपाय –आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दूध घालून अंघोळ करावी.
तूळ
आरोग्याच्या दृष्टीने तितकासा अनुकूल काळ नाही. पथ्यपाणी सांभाळावे लागेल. एखाद्या जुन्या मित्राची मदत मिळून कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. कुटुंबातील वातावरण गढूळ होईल असे वर्तन एखाद्या व्यक्तीकडून घडू शकते. स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने चांगली वेळ आहे. प्रेमप्रसंगात समाधानकारक घटना घडतील. गुंतवणूकीतून फायदा होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱयांनी जास्त मेहनत करावी.
उपाय –गाईला चारा घालावा.
वृश्चिक
या काळात हवामानातील बदलामुळे किंवा जुनाट रोग वर आल्याने तब्येतीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे हितावह ठरेल. पैशांच्या बाबतीत एखाद्या माणसाकडून धोका मिळू शकतो, सावध रहा. कौटुंबिक जबाबदाऱया वाढतील. प्रवास घडेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणाऱयांना अनुकूल वेळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. वाईट स्वप्ने पडू शकतात.
उपाय –हनुमानाला बुंदीचा लाडू अर्पण करावा.
धनु
तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरा कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करू शकतो. कामाच्या ठिकाणी काही लोकांच्या वागण्याचा त्रास होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्ती सहकार्य करतील. पाहुण्यांचे आगमन शक्मय आहे. प्रवासाची शक्मयता आहे. सही करताना विचार करुन करा. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमप्रकरणात फसवणूक होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा त्रास संभवतो.
उपाय-दुपारी दत्त दर्शन घ्यावे.
मकर
आरोग्याच्या समस्या सुटल्यामुळे हलके वाटेल. या काळात तुमचा मूड चांगला असेल. मित्रांसोबत एखादी छोटी सहल प्लॅन कराल. धनप्राप्तीचे नवे पर्याय सापडल्याने आनंद प्राप्त होईल. कौटुंबिक समाधान मिळेल. भावंडांचे सहकार्य प्राप्त होईल. शेजारी राहणाऱया व्यक्ती मुळे फायदा संभवतो. जमिनीच्या बाबतीत असलेल्या व्यवहार सध्या टाळा. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. गुंतवणूक करताना सावध राहा.
उपाय –चादर दान द्यावी.
कुंभ
येणाऱया काळामध्ये सगळय़ा प्रकारची संपन्नता प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पण कष्टाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबातील व्यक्तींच्या सहकार्याने धनप्राप्तीचे योग आहेत. प्रवास करताना सावध राहण्याची गरज आहे. तब्येत बिघडणे किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. जमिनीचे व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. मंगल कार्य करता खर्च होईल.
उपाय– हिरवे मूग दान द्यावे.
मीन
सगळय़ा दृष्टीने अनुकूल काळ आहे. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही अशा लोकांकडून सहयोग मिळाल्याने आश्चर्य वाटू शकते. पैशांच्या बाबतीत मात्र सावध राहणे गरजेचे आहे. कुटुंबात लहान-मोठे भांडण झाल्याने मानसिक तणाव येऊ शकतो. कागदोपत्री व्यवहार करताना चूक होऊ नये याची खबरदारी घ्या. प्रेमसंबंधांमध्ये वाढ होईल. गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला सगळय़ा बाजूने यश मिळेल.
उपाय– मंदिरात फळे दान द्या.