Tarun Bharat

राशी भविष्य

23-11-2022 ते 29.11.2022

तेरे मेरे सपने  (स्वप्न शास्त्रः भाग 1)

 मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू? तेरे मेरे सपने! देखा मैने देखा है एक सपना! मुंगेरीलाल के हसीन सपने! स्वप्नातील राजकुमार! ड्रीम गर्ल! स्वप्नसुंदरी! जास्त स्वप्न बघू नको! अमेरिकेला जायचे माझे स्वप्न आहे! माझ्या मुलांनी माझे स्वप्न पूर्ण केले! स्वप्नातदेखील पाहिलं नाही! परवा मी तुला स्वप्नात बघितलं! इत्यादी इत्यादी. वरील गाणी आणि संवाद ओळखीचे वाटतात ना? विषयच आपल्या सगळय़ांचा इतका जिव्हाळय़ाचा आहे. भारतात ज्योतिषशास्त्र हे इतर अनेक शास्त्रांशी जोडले गेलेले आहे. बरेच लोक ज्योतिषाला ‘मला अमुक अमुक स्वप्न पडले त्याचा अर्थ काय आहे?’ असा प्रश्न विचारतात. पहाटे पडलेली स्वप्ने खरी ठरतात असा समजदेखील आपल्याकडे आहे. दिवास्वप्ने, सूचक स्वप्ने, शुभ आणि अशुभ स्वप्ने असे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत. या स्वप्न शास्त्राचे गमक काय आहे? स्वप्नांचे प्रकार किती व कोणते? स्वप्नांचे अर्थ कसे लावायचे? त्यावर उपाय काय आहेत या सगळय़ाची माहिती देण्याकरता ही लेखमाला आहे. भारतात ज्याप्रमाणे स्वप्नशास्त्राचा विचार केला जातो त्याचप्रमाणे इतर देशातही स्वप्नशास्त्रावर विपुल साहित्य उपलब्ध आहे. दुर्दैवाने भारतात स्वप्नांबद्दल वैज्ञानिक विचारसरणी पूर्वक जास्त संशोधन झाले नाही असे आढळते. 1899 साली जर्मन मनोवैज्ञानिक सिग्मंड फ्रॉइड याने इंटरप्रेटेशन ऑफ ड्रीम्स (जर्मनीत `Die Traumdeutung’) पुस्तक लिहिले आणि मनोविज्ञान क्षेत्रात एकच खळबळ उडाली. स्वप्नांकडे याही दृष्टीने पाहिले जाऊ शकते हे पहिल्यांदा लोकांना कळाले. सिग्मंड फ्रॉइड कधीही आपल्या पेशंटला काय वाटते, कसे वाटते हे विचारण्याआधी स्वप्ने काय पडतात, कुठली पडतात, कधी पडतात हे विचारून त्यावर भर देत असे. 1921 साली प्रकाशित झालेल्या सिग्मंड फ्रॉइडच्याच आणखी एका पुस्तकात ‘dreams and telepathy’ न्यूरो कॉग्निशन म्हणजे तंत्रिका समूह ज्याने आपले वागणे बोलणे ठरते त्याचा आणि स्वप्नांचा संबंध स्पष्ट केला आहे. कार्ल जुंगने देखील ‘द सोसायटी ऑफ अनलिटिकल सायकॉलॉजी’ मध्ये स्वप्नांबद्दल बरेच लिहिले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे. कुंडलीतील चतुर्थ स्थान हे निदेचे आहे. चंद्राचा इतर ग्रहांशी असलेला संबंध, युती दृष्टी, योग, चंद्राला प्राप्त असलेले बोल, चतुर्थ स्थानाचे स्वरूप यावरून स्वप्नांचा विचार केला जातो. नेपच्यून हा ग्रह जर चंद्राशी संबंधित असेल तर सूचक स्वप्ने पडतात. स्वप्नासंबंधी ज्योतिषशास्त्राचे मत, शुभ अशुभ स्वप्नांचे स्वरूप आणि त्यांचे परिणाम, त्यावर उपाय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वप्नांची परिभाषा, त्यांचे प्रकार, त्यांचे स्वरूप आणि त्याचे अर्थ हे सगळे आपण पुढच्या भागात बघणार आहोत.

महा उपाय ः दृष्ट लागण्यावरः एक लहान कापडाचा तुकडा घेऊन हळदीच्या पाण्यात बुडवावा. नंतर त्या फडक्मयात ठेवून पुरचुंडी बांधावी व दोऱयाला अडकवून दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या गळय़ात बांधावी.

सोपी वास्तु टिपः दक्षिण-पूर्व भागात छतावर टाकी आल्यास टाकीच्या बाजूने दीड इंच मोठी लाल चिकटपट्टी लावावी.

मेष

प्रॉपर्टीच्या दृष्टीने किंवा स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने येणारा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. यासंबंधी कोणतेही निर्णय घेताना चार चौघांना विचारून घ्या. आरोग्याविषयी जागरूक राहण्याची गरज आहे. काही वाईट सवयी सोडायचा आत्ता प्रयत्न केला तर यशस्वी व्हाल. नोकरदार वर्गाला मॅनेजमेंटकडून चांगली बातमी कळू शकते. वैवाहिक जोडीदाराचे मत विचारात घेतले तर वाद टळतील. विदेश प्रयाणाकरता उत्तम काळ आहे.

उपाय मंदिरात हिरवे फळ दान द्यावे

 वृषभ

कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्याकरता किंवा कामानिमित्त प्रेझेंटेशन करण्याकरता हा काळ उत्तम आहे चांगल्या प्रकारे यश प्राप्त होईल. प्रॉपर्टी संबंधी अडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये यश मिळेल. आर्थिक आवक जेमतेम राहील. कुटुंबात वाद होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. या काळात नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात. जोखमीच्या गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. तीर्थयात्रा घडू शकते.

उपाय तांबडे वस्त्र दान द्यावे

 मिथुन या काळात पूर्वी अडकलेले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये यश मिळेल. कुटुंबात सुसंवाद घडल्याने मन खुश राहील. याचबरोबर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या हट्टाला पूर्ण करावे लागेल. कंपनीमध्ये काम करत असाल तर तिथे तुमच्या वागण्या बोलण्याचा चांगला फायदा होईल. प्रॉपर्टीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. प्रेम संबंधात दुरावा येण्याची शक्मयता आहे. संतती विषयी काळजी वाटेल. जोडीदाराबरोबर वाद टाळा.

उपाय हळकुंड दान द्यावे

 कर्क

तुम्ही समजता तितकी तुमची प्रकृती नाजूक नाही हे ध्यानात घेण्याची वेळ आहे. आत्मविश्वासपूर्वक कामे केल्यास ती पूर्ण होतील. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील व्यक्तींची साथ लाभेल. त्यातही भावंडांची साथ महत्त्वाची ठरेल. स्थावर मालमत्तेच्या संबंधी काही निर्णय घेण्यास सध्याला अनुकूल काळ नाही. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. देवदर्शना करता लांबचा प्रवास करण्याचा विचार कराल.

उपाय पांढऱया गाईची सेवा करावी

 सिंह

आरोग्य आणि धनप्राप्ती या दोन्ही संबंधी चिंता करण्याची आवश्यकता नाही. अपेक्षा नसताना एखादी व्यक्ती आर्थिक मदत करू शकते. कुटुंबात ज्येष्ठाचा सल्ला ऐकल्याने अडलेली कामे पूर्ण होतील. कागदोपत्री सही करत असताना सावध रहा. कागदपत्रे जमा करण्याचे वेळी ती पूर्ण आहेत का हे तपासणे आवश्यक ठरेल. प्रेम प्रकरणात फसवणूक होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला केलेल्या कामाचे योग्य फळ मिळेल.

उपाय सूर्य दर्शन घेऊन कामे करावीत

 कन्या

तब्येतीच्या छोटय़ामोठय़ा तक्रारी दूर होतील पण हवामान बदलाचा हा परिणाम होऊ शकतो. या काळात आत्मविश्वास आम मध्ये वाढ होईल. कोणालाही उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका. घरातील वाद-विवाद बाहेर जाऊ नयेत याची काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभाची शक्यता आहे. खेळाडूंना आणि कलाकारांना विविध संधी प्राप्त होतील.

उपाय देवीला कुंकुमार्चन करावे

 तूळ

भावंडांमध्ये वाद होऊ नयेत याची विशेष दक्षता घ्यावी लागेल. या काळात मन थोडे अस्थिर राहण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्या तक्रारिंकडे दुर्लक्ष करु नका. वाहन खरेदी किंवा स्थावर मालमत्तेच्या व्यवहारामध्ये चांगले यश मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामाचे कौतुक होईल. पाळीव प्राणी घेण्याचा विचार करत असाल तर अनुकूल काळ आहे. शेतकरी वर्गाला समाधान कारक उत्पन्न मिळवण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील.

उपाय अन्नदान करावे

 वृश्चिक

आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर घेतलेला औषधोपचार लागू पडेल. घरात छोटे-मोठे वाद होऊ शकतात. सध्या जरी आर्थिक अडचण असली तरी लवकरच परिस्थिती सुधारेल. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. जमिनी बाबतीत काही निर्णय सध्या टाळावेत. प्रेमसंबंधात सुधार होईल. छोटय़ा आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. समाजामध्ये मान-सन्माना मध्ये वाढ होईल.

उपाय लाल गायीची सेवा करावी

 धनु

आर्थिक दृष्टय़ा सक्षम होण्यासाठी उत्तम काळ आहे. कुटुंबातील लोकांची चांगली साथ प्राप्त होईल. एक छोटेखानी फंक्शन देखील होऊ शकते. प्रवास सध्या टाळलेला बरा. प्रॉपर्टीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. प्रेम प्रसंगात वादाची शक्यता आहे. शेअर बाजारापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठाचा त्रास जाणवू शकतो. वैवाहिक जोडीदाराने मनासारखे न वागल्यामुळे मन उदास होऊ शकते.

उपाय गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी

 मकर

आरोग्य उत्तम असेल. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. तुमच्या बोलण्यामुळे कुणाचे मन दुखावले जाऊ नये याची दक्षता घ्या. पुढे जाऊन याचा त्रास होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य प्राप्त होईल. अडचणीच्या प्रसंगी शेजारी मदतीला येथील. प्रेमसंबंधात दगाफटका होण्याची शक्मयता आहे. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरीत काम करणाऱयांनी आपले काम चोख करावे. वैवाहिक जीवन आनंदमय असेल.

उपाय पिवळे वस्त्र दान द्यावे

 कुंभ

आरोग्य विषयक थोडय़ा मोठय़ा समस्या त्रास देऊ शकतात. आर्थिक आवक उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ चांगला जाईल. प्रभा सध्या टाळलेला बरा. आई संबंधी काळजी वाटू शकते. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. तुमच्यात असलेल्या कलागुणांना वाव सध्या न मिळाल्याने मन उदास होईल. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा कराल.

उपाय कष्टकरी मजुरांना दूध दान द्या

 मीन

निस्वार्थी स्वभावाने केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. पायांची दुखणी त्रास देऊ शकतात. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. एखाद्या तिऱहाईत व्यक्तीमुळे कुटुंबात वाद होऊ शकतो. प्रवासात त्रास होऊ शकतो. गुंतवणुकीचा फायदा होईल. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल. विवाहोत्सुक लोकांना चांगली स्थळे प्राप्त होऊ शकतात. नोकरीमध्ये वरिष्ठाचे सहकार्य मिळाल्याने अवघड कामे पूर्ण होतील. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.

उपाय दत्त दर्शन घ्यावे.

Related Stories

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 2022

Patil_p

तुमचे ग्रह आमचा अंदाज

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 20 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 8 सप्टेंबर 2020

Patil_p
error: Content is protected !!