Tarun Bharat

राशी भविष्य

दि. 19 ते 25 मार्च 2023 पर्यंत

मेष

ऑफिसमध्ये एखाद्या महिला कर्मचाऱ्याच्या वागणुकीमुळे किंवा चुकीमुळे त्रास होऊ शकतो. आपल्या कामाशी मतलब ठेवल्यास प्रसंगातून नुकसान होणार नाही. नको त्या ठिकाणी खर्च झाल्यामुळे आर्थिक नियोजन ढासळू शकते. तब्येतीला विशेषत: जपावे लागेल. पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. पैशांच्या बाबतीत विशेष काळजी करू नका.

पाच लाल गुंजा जवळ ठेवा

 वृषभ

आठवड्याची सुऊवात चांगली असेल. आशादायक वातावरण असल्याने कामे करण्यास हुरूप येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रवासाला जाण्याचा बेत कराल. एखाद्या छोटेखानी समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आनंद होईल.

तुळशीची पाने जवळ ठेवावे

 मिथुन

आर्थिक दृष्टीने हा आठवडा उत्तम असेल. काही ठिकाणी संधी गमावल्यामुळे थोडे नुकसान होऊ शकते. पण एकंदर कमाई चांगली असेल. आरोग्याची तक्रार कमी होईल पण खूपच करू नका. विचारांना योग्य दिशा मिळून निर्णय घेण्यास मदत होईल. एखाद्या मित्राला मदत करण्याकरता आपले काम सोडून जावे लागू शकते. बोलण्यात गोडवा ठेवा.

पिंपळाचे पान जवळ ठेवावे

 कर्क

तब्येतीच्या लहान-सहान तक्रारी वाढल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाली आहे की काय असे वाटू शकते पण योग्य वैद्यकीय उपचाराने आरोग्य सुधारेल. कामाचा बोजा वाढल्यामुळे कोणती कामे आवश्यक आहेत याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा. आठवड्याची सुऊवात एखाद्या चांगल्या बातमीने होऊ शकते. नातेवाईकांची भेट होण्याची शक्मयता आहे.

अत्तर जवळ ठेवावे

 सिंह

सगळीच कामे मनासारखी होत नसतात काही वेळेला आपल्याला तडजोड करावी लागते, असे अनुभव या आठवड्यात येतील. कामावरचे लक्ष बिघडू देऊ नका आणि मन शांत ठेवा. ऑफिसमध्ये न केलेल्या चुकीबद्दल बोलणे लागू शकते. आर्थिक आवक चांगली असेल. व्यवसायिकांना हा आठवडा चांगला जाईल. लेखी व्यवहारात सावध रहा.

तपकिरी कवडी जवळ ठेवा

 कन्या

कुणाचीही केलेली चेष्टा किंवा मस्करी अंगलट येऊ शकते. दुसऱ्याशी बोलत असताना सावध राहण्याची गरज आहे. या आठवड्यामध्ये काही कामांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात, पण दुसऱ्याची मदत घेतली तर कामे होतील. अति भावनिक होऊन निर्णय घेणे नुकसानदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनातील मतभेदांविषयी इतरांशी चर्चा करू नका.

साखर दान द्या

 तुळ

काही प्रतिष्ठित लोकांमुळे किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठांमुळे मानसिक त्रासाची शक्मयता आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल कौतुक न करता चुका काढल्यामुळे चिडचिड होईल. संततीबद्दल काळजी वाटू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक आवक चांगली असेल. व्यावसायिकांना नव्या संधी प्राप्त होतील. लाजाळूची 11 पाने जवळ ठेवावीत

वृश्चिक

तब्येतीबद्दल अनावश्यक काळजी वाटेल. शारीरिक त्रासापेक्षा भीतीमुळे किंवा काळजीमुळे त्रास होऊ शकतो. अशावेळी मन शांत ठेवून कामे करावीत. काही देणेकरी त्रास देऊ शकतात. या आठवड्यात चुकूनही कर्ज काढण्याच्या भानगडीत पडू नका. आठवड्याच्या शेवटी मोठे काम मिळण्याची शक्मयता आहे. संधीचा लाभ घ्यावा.

लाल दोरा गळ्यात बांधावा

 धनु

या आठवड्यात जितके शक्मय होईल तितके स्वत:च्या विचारांवर ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार टाळायचे कसे हे शिकण्याकरता योग्य काळ आहे. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकते. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला बऱ्याच वेळेला कामी येईल. नातेवाईकांकडून नुकसान संभवते.

पक्ष्यांना दाणे घाला

 मकर

या आठवड्यात प्रत्येक कामाकरता अति परिश्र्रम करावे लागतील असे दिसते. अनेक लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यातील काही व्यक्तींच्या ओळखीमुळे नवीन कामे मिळण्याची शक्मयता आहे. व्यवसायिकांना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायची गरज आहे. आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका.

अन्नदान करावे

कुंभ

या आठवड्यात काही प्रसंग असे येतील की त्यातून तुम्हाला लोकांची नकारात्मक बाजू कळण्याची किंवा समजण्याची शक्मयता आहे. काही गुप्त गोष्टी कळतील. पूर्वी कुणाला दिलेल्या वचनाला पूर्ण करावे लागू शकते. अशावेळी एका ज्येष्ठ आणि जाणकार माणसाचा सल्ला उपयोगी पडेल. मेहनतीचा चांगला परतावा मिळाल्याने खुश व्हाल.

गोमती चक्र जवळ ठेवावे

 मीन

हा आठवडा सगळ्या दृष्टीने धावपळीचा असण्याची शक्मयता आहे. घरातील कामे, बाहेरची कामे आणि जबाबदाऱ्या यामुळे अतिरिक्त ताण येऊन तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी सगळ्या बाजूने सावरून धरण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत कोणाशीही वाद घालू नये. आर्थिक बाजू चांगली असेल.

मुंग्यांना साखर घालावी

 तरुण वयात मुले मुली आकर्षणाच्या जाळ्यात अडकतात. या वयात परिपक्वता नसल्यामुळे अशा प्रसंगात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी पालकांनी बावरून न जाता इतर उपायांबरोबर हा उपायही करून बघावा. लोखंडाचा चौकोनी तुकडा गॅसवर लाल होईपर्यंत तापवावा, तापवताना वाकडे पाऊल पडलेल्या मुलाचा/मुलीचा चेहरा समोर आणावा. लाल झाल्यानंतर तो तुकडा थंड पाण्यात बुडवावा. मुलाच्या/मुलीच्या अंघोळीच्या पाण्यात हे पाणी घालावे.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. १४ सप्टेंबर २०२१

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य 02-07-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

राशी भविष्य

Patil_p