तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी!!!
‘लॉ ऑफ व्हायब्रेशन’ चा संबंध केवळ इच्छापूर्ती करता, जी हवे, ते मिळवण्याकरता इतकाच नसून, ज्योतिष शास्त्र, उपाय, जादुटोणा, तंत्रविद्या (पाश्चात्य, भारतीय, पौर्वात्य.) या सगळ्यांशी आहे. आजपर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये 12 वैश्विक सिद्धांत शोधले गेले. याचा अर्थ ते पूर्वी नव्हते, असे नाही. ज्याप्रमाणे न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधला, त्याही अगोदर गुरुत्वाकर्षण होतेच. त्याप्रमाणे जोपर्यंत हे बारा वैश्विक सिद्धांत लोकांनी शोधले नव्हते तेव्हाही अस्तित्वात होतेच. आज या वैश्विक सिद्धांतांना एका सिस्टीममध्ये बसवले गेले आहे इतकेच. हे बारा वैश्विक सिद्धांत तेव्हाही काम करत होते, आजही काम करतात आणि उद्याही काम करतील. म्हणजे हे त्रिकालाबाधित सिद्धांत आहेत. ‘लॉ ऑफ व्हायब्रेशन’ हा दुसरा सिद्धांत आहे, यापूर्वी आपण चर्चा केलेला ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ हा चौथा सिद्धांत आहे.
सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत हा पहिला सिद्धांत ज्याला ‘लॉ ऑफ वननेस’ असे म्हणतात. एकात्मतेचा नियम! याचा अर्थ वैश्विक अणु-रेणूंची आपण जोडले गेलेलो आहोत, म्हणजेच तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये जे अणु-रेणू आहेत, ते एकमेकाला कनेक्टेड आहेत, जोडलेले आहेत. ज्ञानेश्वर माउलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले, ते याच सिद्धांताच्या आधारे. माउली म्हणतात, ‘जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । तें ममरूपसंभव । वोळखें तूं । 53 ।’ जे सत्त्वापासून झालेले पदार्थ किंवा रज, तम या गुणांपासून झालेले सर्व, ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत, असे समज. । अध्याय 7- श्लोक 53।’ आदि शंकराचार्यांनी निर्वाण-अष्टकामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणीम् । सदा मे समत्वं न बंध्योर्नमुक्ती चिदानन्द रूप? शिवेहम् शिवेहम्‘ म्हणजेच ‘लॉ ऑफ वन नेस’!!
कुराणात सूर-ए-यासीन मधील फायाकुन ??? ???? म्हणजेच ‘लॉ ऑफ वन नेस’!!! आता ‘लॉ ऑफ व्हायब्रेशन’ चा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करता येईल आणि आपल्याला हवे ते कसे मिळवता येईल, हे सांगतो. लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही वापरत असलेल्या सगळ्या वस्तू जसे की मोबाईल, कपडे, तुमच्याकडे असलेले मांजर, कुत्रे, आजूबाजूची झाडे म्हणजे वास्तविक असलेल्या सगळ्या वस्तू, आणि प्रत्यक्षात न दिसणाऱ्या संकल्पना जसे की, तुमचे विचार, तुमच्याबरोबर राहणाऱ्यांचे विचार, तुम्हा सगळ्यांच्या भावना इत्यादी हे सगळे एनर्जी म्हणजे ऊर्जेने बनलेले आहे आणि ही एनर्जी सतत कंपन पावत आहे आणि या कंपनीचा तुमच्यावर सातत्याने परिणाम होत आहे. मग तो चांगला असो किंवा वाईट. ग्रहांची स्पंदने, वस्तुंची स्पंदने, विचारांची स्पंदने, लोकांची स्पंदने तुमच्या विचारांवर परिणाम करतात आणि त्याच प्रमाणे मग आयुष्यातील घटना घडतात. आपल्याला हव्या तशा घटना कशा घडवायच्या, हे पुढच्या भागात सांगतो. (क्रमश:)
महाउपाय:
एखाद्या व्यक्तीच्या अडीअडचणीच्या वेळेला आपण त्याला आर्थिक मदत करतो, पैसे देतो आणि नंतर ती व्यक्ती पैसे परत करायचे नावच घेत नाही. काही वेळेला आपण दुसऱ्याकडून मागून पैशाची मदत केलेली असते. अशा वेळेला आपण अडकतो. समोरची व्यक्ती काही केल्या दाद देत नाही. अशावेळी एक बेलाचे पान घ्यावे. मधल्या पानावर अनामिकेने गोपी चंदनाचा लेप लावावा. ज्याने पैसे घेतले आहेत, त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणून ते पान शंकराच्या पिंडीवर चिकटवावे. एक तांब्या गंगाजल अर्पण करावे. हा उपाय पाच प्रदोष करावा.
सोपी वास्तू टीप: घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर फाउंटन, कारंजा किंवा पाण्याशी रिलेटेड कोणतेही डेकोरेशन नसावे.
मेष
आरोग्याची काही विशेष तक्रार असण्याची शक्यता कमी आहे. धन संग्रह न झाल्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते आणि त्याचा परिणाम घरातील सदस्यांवर होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरदार वर्गाला बॉसकडून शाबासकी मिळेल. समाजात मान, सन्मानात वाढ होईल.
उपाय – मंगळवारी गणपतीचे दर्शन घ्या
वृषभ
नुसते कष्ट करून उपयोग होणार नाही. आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात. एखादा निर्णय घेण्याकरता घरातील सदस्यांमध्ये एकमत होण्याची शक्यता कमी आहे. प्रवास शक्यतो करू नका. लहान मोठ्या गुंतवणुकीमधून चांगल्या प्रकारचा परतावा मिळू शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. व्यवसायवृद्धी होईल.
उपाय – देवीला लाल फुल अर्पण करा
मिथुन
तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खर्च वाढल्याने पैशांची आवक कशी वाढेल, याचा विचार करावा. प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना सोबत काम करणाऱ्यांपासून त्रास संभवतो.
उपाय – लहान मुलींना मिठाई वाटा
कर्क
आरोग्याला जपा. तब्येतीच्या लहान मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, अंगावर काढू नका, त्याचा त्रास होऊ शकतो. पैशांची आवक थोडी कमी असली तरी विशेष काळजी करण्याची गरज नाही. प्रवासाला जायचे योग आहेत. प्रेम प्रसंगामध्ये कटुता येऊ शकते. नोकरदार वर्गाला विशेष सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय – काळे पांढरे तीळ दान द्यावे
सिंह
तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवेल, अशी एखादी घटना घडण्याची शक्यता आहे. कुपथ्य केल्यामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पैशांची आवक समाधानकारक असेल. नवीन गुंतवणुकीकरता चांगला काळ आहे. नोकरदार वर्गाला कष्टाचे फळ मिळेल.
उपाय – तुळशी खालील माती जवळ ठेवा
कन्या
खेळीमेळीमध्ये केलेली चेष्टा आणि कुचेष्टा यातील फरक समजून घ्यायला हवा. तब्येतीचा पाया चांगला असला तरी काळजी घेणे सोडू नये. कुटुंबातील सदस्यांमध्ये लहान-सहान कारणाने वाद होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवास टाळलेला बरा. जमिनीसंबंधी व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गालाही फायदा होईल.
उपाय- मिठाई दान द्यावी
तूळ
व्यावहारिकपणा आणि भावनिक गुंतवणूक यामध्ये सुवर्णमध्य साधावा लागेल. कंबर दुखणे किंवा हाडांचे विकार त्रास देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर बरेच निर्णय घ्यावे लागतील. प्रॉपर्टीसंबंधी कामांमध्ये यश मिळू शकते. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. मनोरंजनाकडे जास्त लक्ष असेल. पण चैनीला आवर घाला.
उपाय – शंकराच्या पिंडीवरती निरसे दूध घालावे
वृश्चिक
आरोग्याच्या विविध समस्या एकदम उद्भवल्यामुळे त्रास होऊ शकतो. पण थोड्या काळामध्ये या समस्या कमी होतील. कागदोपत्री व्यवहारांमध्ये चांगले यश मिळेल. प्रवासाचे चांगले योग आहेत. प्रॉपर्टीची कामे होतील. शेअर बाजारापासून दूर राहा. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी कळेल. वैवाहिक जीवनात ताण तणाव संभवतो.
उपाय – केळीच्या झाडाला पाणी घालावे
धनु
कुटुंबातील सदस्यांचे एकमेकाबद्दल असलेले नकारात्मक मत बदलेल. एकमेकाला सहाय्य करतील. लहान मोठी भांडणे कमी होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणुकीमधून फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंध मधुर होतील. नोकरीत मानसिक त्रास संभवतो.
उपाय – कपिला गाईला चारा घालावा
मकर
अचानक धनलाभाची शक्यता आहे. विदेशी जाण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असेल. आर्थिक आवक उत्तम असेल. घरातील वातावरण चांगले असेल. प्रॉपर्टीसंबंधी चांगली बातमी करू शकते. शेअरबाजारामध्ये गुंतवणूक सध्या करू नका.
उपाय – मोहरीचे तेल दान द्यावे
कुंभ
बऱ्याच दिवसानंतर आरोग्याविषयी समाधानी असाल. त्यामुळे काम करण्याच्या उत्साहामध्ये वाढ होईल. आर्थिक बाबतीत काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. प्रवास करत असताना सावध रहा. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावी. मंगल कार्याकरता खर्च होईल.
उपाय – मारुतीला रुईच्या पानांची माळ घालावी.
मीन
सांध्यांचे दुखणे किंवा नसा अडकणे यामुळे त्रास होऊ शकतो. धनप्राप्ती उत्तम असेल. पैसे साठवण्याकडे लक्ष द्याल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. प्रवास टाळलेला बरा. कागदोपत्री व्यवहार करत असताना सावध राहणे गरजेचे असेल. नोकरीमध्ये विविध कारणांमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय – मुंग्यांना साखर घालावी