- 10-08-2022 ते 16-8-2022
कालसर्पाची पुंगी! वाजवतो कोण आणि वाजते कुणाची (अंतिम भाग)
मागच्या बुधवारी मुहूर्त आणि इतर महिती दिली. असे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी करायचा मानस आहे. आज कालसर्पाबद्दलचा शेवटचा लेख. ज्योतिषीय विश्लेषणात उपायांना अत्यंत महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे अशुभ योगांचे परिणाम कमी करणे हे उपायांचे उद्दिष्ट असते. उपाय हे कर्मकांड स्वरूपात (म्हणजे ग्रहशांती वगैरे) केले जातात किंवा अत्यंत सोप्या पद्धतीनेसुद्धा उपाय केले जाऊ शकतात. कालसर्प योगावर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत.
1. शिव उपासना करावी. श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा सतत जप करावा 2. पंचमीला अकरा नारळ वाहत्या नदीत प्रवाहित करावेत अशा 11 पंचम्या कराव्यात 3. चांगल्या प्रतीचा हकिक धारण करावा 4. पंचमी दिवशी चांदीचा नाग आणि नागीण शिवलिंगावर अर्पण करावे 5. शनिवारी एका नारळावर मोहरीचे तेल आणि काळे तीळ यांचा टिळा लावून आपल्या उंची एवढा लाल पिवळा धागा बांधून आपल्या डोक्मयावरून ओम रां राहवे नमः मंत्राचा 108 वेळा जप करून तो नारळ वाहत्या पाण्यात/नदीत प्रवाहित करावा. असे कमीत कमी सात शनिवार करावे. 6. प्रत्येक शनिवारी कुत्र्यांना दूध चपाती घालावी. गाईला आणि कावळय़ांना घरी बनलेली पहिली चपाती घालावी. 7. जर तुम्हाला असे जाणवले की कालसर्पाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनामध्ये संतुष्टी नाही आहे तर वैवाहिक जोडीदाराबरोबर विधीवत पुन्हा लग्न करावे 8. घरात मोरपीस जरूर असावे. 9. प्रत्येक महिन्यात 14 किंवा 15 तारखेला संक्रांत असते. म्हणजे सूर्य आपली रास बदलतो. त्यादिवशी गंगाजल आणि गोमूत्र याचा संपूर्ण घरात शिडकावा करावा. 10. तीनशे दिवसात पिंपळाच्या 27,000 प्रदक्षिणा पूर्ण केल्यास कालसर्प दोष निवारण होते. 11. नवनाग स्तोत्राचे नित्य नऊ पाठ करावे. 12. अनंत चतुर्दशीचे व्रत करावे 13. प्रत्येक बुधवारी निळय़ा किंवा काळय़ा कपडय़ांमध्ये एक मूठ काळे उडीद बांधून वटवृक्षाला 21 प्रदक्षिणा घालाव्यात आणि नंतर ती वस्तू भिकाऱयाला दान द्यावी. 13. कृष्ण पक्षाच्या पंचमीला सुरू करून प्रत्येक पंचमीला गव्हाच्या पिठात उडीद घालून त्याचे बारा नाग तयार करावेत त्यांचे पूजन करावे आणि सायंकाळी वाहत्या पाण्यात सोडावे असे वर्षभर केल्याने दुष्प्रभाव दूर होतो 14. शिवमंदिरात पाच तुळशीची झाडे लावल्याने किंवा एक बेलाचे झाड लावल्याने दुष्प्रभाव दूर होतो 15. श्रीमद् भागवताचे पाठ करवून घ्यावे. 16. बुधवारी शुभ मुहूर्तावर सुरू करून एकशे आठ दिवस खंड न पडता सर्प सुक्ताचा पाठ केल्यानेदेखील प्रभाव समाप्त होतो 17. नित्य नेमाने श्री नीलकंठ स्तोत्राचा बेलाच्या झाडाखाली एका बैठकीत पाच वेळा पाठ केल्याने कालसर्पच काय तर पितृदोष, वास्तुदोष, शनी राहू केतू या सगळय़ांचे अनिष्ट परिणाम पूर्ण नष्ट होतात. इतकेच काय तर कोणी काही केले असेल, बाहेरची हवा वगैरे गोष्टीसुद्धा नष्ट होतात
कर्ज मुक्ती आणि संकट निवारणासाठीचा रामबाण उपायः एखाद्या व्यक्तीला पिंजऱयामधून पक्षी घेऊन विकताना पाहिले तर पैसे देऊन पक्षाला मुक्त करा. कर्ज आणि संकट लवकर दूर होते.
सोपी वास्तू टिप
पैसे येण्याकरता आणि टिकण्याकरता बरेच लोक मनी प्लांट लावतात पण ते कसे आणि कुठे ठेवावे हे माहीत नसते. मनी प्लांट जांभळय़ा रंगाच्या कुंडीमध्ये ईशान्य दिशेला ठेवावे.
मेष
सगळय़ा प्रकारच्या लाभाच्या दृष्टिकोनातून येणारा काळ अनुकूल आहे. तब्येतीची साथ राहील. धनप्राप्तीच्या बाबतीत समाधानी असाल. लहान भावाशी किंवा शेजाऱयांशी वादावादी टाळावी. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. शेअर्ससारखी धोकादायक गुंतवणूक करू नका. प्रेमसंबंधात तणाव येऊ शकतो. नोकरदार वर्गाला वरि÷ांकडून त्रास संभवतो. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपायः गाईला गोड चपाती घालावी.
वृषभ
एफ.डी. करण्याकरता किंवा धनसंचय करण्याकरता हा काळ अतिशय उत्तम असेल. घरातील सदस्यांबरोबरचे संबंध सुधारतील. नातेवाईकांच्या घरी जाणे होईल. एखादा जुना मित्र भेटेल. प्रवास टाळावा. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. वाहनात बिघाड होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला मात्र वरि÷ांकडून कौतुकाची अपेक्षा करायला हरकत नाही. वैवाहिक जोडीदाराशी वाद होईल.
उपायः सफेद रुमाल जवळ ठेवावा.
मिथुन
काही गोष्टींची विशेष करून तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःबरोबर आईच्या तब्येतीचीही काळजी घ्या. दुखणे अंगावर काढू नका. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. उलट काही ठिकाणी जास्त खर्च होण्याची शक्मयता आहे. येणारा काळ हा धोकादायक गुंतवणुकीपासून लांब राहण्याचा आहे. वैवाहिक सुख उत्तम असेल. मानसन्मान मिळेल. वाहन जपून चालवा.
उपायःगणपतीला दुर्वांची माळ घालावी.
कर्क
तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. काही बाबतीत आत्मविश्वास कमी पडेल. त्याचबरोबर कुटुंबाची साथही तितकीशी मिळणार नाही. पैशांची आवक चांगली असेल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. कामाच्या कौतुकाबरोबर पगारवाढसुद्धा मिळू शकते. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य उत्तम असेल.
उपायः श्रीसुक्ताची आवर्तने करून घ्यावाr
सिंह
प्रवास करण्याकरता उत्तम कालावधी आहे. लेखी व्यवहारांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. भावंडांची साथ मिळेल. तब्येत सांभाळावी लागेल. आर्थिक आवक मनासारखी असणार नाही. नवीन वास्तुकरता खर्च होईल. वाहनप्राप्तीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. व्यवसायात प्रगती होईल.
उपाय ः गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात.
कन्या
धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत आनंदाने वेळ घालवाल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. एखादे अवघड काम होईल. प्रवास मात्र टाळावा लागेल. कागदपत्र हरवण्याची शक्यता आहे. आयत्यावेळी भावंडाचे सहकार्य मिळणार नाही. स्थावर संपत्तीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला शाबासकी मिळेल. जोडीदाराशी भांडण संभवते.
उपाय ः सौभाग्य अलंकार भेट द्यावे
तूळ
एखादा आजार असल्यास त्यातून बरे व्हाल. कुटुंबात छोटे मोठे भांडण होण्याची शक्मयता आहे. पुढे होणाऱया खर्चाची तयारी आत्ताच करून ठेवा. प्रवासाच्यादृष्टीने उत्तम कालावधी आहे. वाहन खरेदीचे योग आहेत. एखादी मालमत्ता विकत घेण्याचा विचार करा. प्रेमसंबंधात सुधारणा होईल. नोकरदार वर्गाने कोणावरही अवलंबून न राहता आपले काम चोख करावे. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपायः हिरवी वस्तू दान करावी.
वृश्चिक
तब्येतीवर खूप अर्थाचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे खानपानाच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे. आर्थिकदृष्टय़ा चांगली वेळ आहे. व्यावसायिकांना कामातून फायदा होईल. एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा विचार कराल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. शेअर बाजारात गुंतवणूक न केलेली बरी. प्रेमींना नातेवाइकांकडून उपद्रव होईल.
उपाय ःमंदिरात मुळा दान करावा
धनु
आरोग्य चांगले असेल. मित्रमैत्रिणींशी असलेले संबंध दृढ होतील. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबात सुसंवाद घडेल. प्रवासाचे योग आहेत. मातृ सुख चांगले मिळेल. प्रेम संबंधात दुरावा येईल. पैसे उधारी दिल्यास परत मिळणार नाहीत. नोकरदार वर्गाला प्रशंसाप्राप्तीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सुवर्णकाळ असेल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील. वडिलांविषयी काळजी वाटू शकते.
उपायः पिंपळाला प्रदक्षिणा घालावी
मकर
हट्टी स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. आरोग्य उत्तम असेल पण तरीही काळजी घेतलेली बरी. आत्मविश्वास वाढेल. धनप्राप्तीचे मार्ग मिळतील. प्रवास शक्मयतो टाळावा. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात चांगली घटना घडेल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात ताण तणावाचे प्रसंग येऊ शकतात. त्यामुळे शक्मयतो नमते घ्यावे.
उपाय ःवडाच्या झाडाजवळची माती जवळ ठेवावी
कुंभ
येणारे काही दिवस आर्थिकदृष्टय़ा तितकेसे अनुकूल नाहीत त्यामुळे कष्टाचे प्रमाण वाढवावे आणि चातुर्याने व्यवसाय करावा. नोकरदार वर्गालादेखील वरि÷ांचा त्रास होऊ शकतो आणि कामाचा ताण वाढू शकतो. यामुळे कुटुंबातील वातावरणावर परिणाम होईल. प्रवासाला जाऊ शकता. जमिनीच्या व्यवहारात चांगल्या प्रकारे यश मिळेल. धोकादायक गुंतवणूक करू नका.
उपायः शमी वृक्षाला नमस्कार करावा
मीन
तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. त्याला काही पर्याय नाही. धनप्राप्ती उत्तम असेल. काही नवीन योजना सुरू करू शकता त्यातून फायदा होईल. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागेल. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. जमिनीचे व्यवहार टाळा. प्रेमामध्ये समोरची व्यक्ती योग्य न वागल्याने रागराग होईल. नोकरीमध्ये छोटीशी चूकसुद्धा मोठे नुकसान करू शकते. जोडीदाराची काळजी घ्या.
उपायः गाईला चारा घालावा