मेष
स्वभावामध्ये चंचलता येण्याची शक्मयता आहे. बेदरकार वागण्यावर लगाम घालणे आवश्यक ठरेल. पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. पैसे साठवण्याकडे कल असेल. प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. मातृ चिंतेचा काळ आहे. प्रतिस्पर्धी जिंकण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने सावध रहावे.
उपाय ः केळीच्या झाडाची पूजा करावी.
वृषभ
आरोग्याचा पाया मजबूत रहावा म्हणून विशेष प्रयत्न कराल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तब्येत साथ देईल. धनप्राप्ती उत्तम असेल. घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. डॉक्मयुमेंटेशनमध्ये चुका होण्याची शक्मयता आहे. शेजाऱयांशी वाद संभवतो. प्रेम प्रकरणात ताणतणाव अनुभवाल. नोकरीत वरि÷ांचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक सुख उत्तम असेल. नशिबाची साथ आहे.
उपाय ः पांढऱया गाईची सेवा करावी
मिथुन
हिमतीने मोठी कामे हातात घ्याल. काही बाबतीमध्ये आर्थिक नुकसान संभवते. एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील वाद घराबाहेर जाऊ देऊ नका. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याकरता कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील.
उपाय ः गाईला पालक घालावा
कर्क
ग्रहसंकेत असे आहेत की तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. कुपथ्य करण्याने आजार बळावू शकतो. घरातील वातावरण काहीसे नाराजीचे असेल. लहान भावंडांबरोबर वाद होणार नाही याची काळजी घ्या, जमिनीचे व्यवहार तूर्तास टाळलेले बरे. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. करमणुकीकडे कल असेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे प्रसंग येण्याची शक्मयता आहे.
उपाय ः तांदळय़ाच्या खिरीचा नैवेद्य चंद्राला दाखवावा
सिंह
डोकेदुखी किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो. दुसऱयाशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. कुटुंबात थोडे मतभेद होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल वेळ आहे. नोकरदार वर्गाला बोनस, इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन मिळू शकते. छोटय़ा गुंतवणुकीकरता योग्य वेळ नाही. प्रेमसंबंधांमध्ये ताण तणावाची स्थिती येऊ शकते. वैवाहिक जोडीदारासोबत आऊटिंगला जाऊ शकाल.
उपाय ः सूर्याला अर्घ्य द्या
कन्या
तणावाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीमध्ये गाफिल राहून चालणार नाही. फसवणूक होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. शेजारी मदतीला येतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरि÷ांचे सहकार्य प्राप्त होईल.
उपाय ः अत्तराची बाटली जवळ ठेवावी.
तूळ
येणाऱया काळामध्ये तब्येतीला जपावे लागेल. छोटय़ा-मोठय़ा दुखापतींपासून सावध रहावे. पैशांची आवक उत्तम असेल. एखादा नवीन दागिना खरेदी कराल. कुटुंबातील वातावरण पोषक असेल. प्रवास टाळावा. सही करताना सांभाळावे. गुंतवणुकीतून फायदा आहे. नोकरदार वर्गाला राजकारणाचा त्रास होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. देवदर्शनाकरता प्रवास कराल.
उपाय ः देवीला कुंकूमार्चन करावे.
वृश्चिक
कामांचा ओघ येईल पण तुम्ही मागे पडू नका. तब्येतीची उत्तम साथ असेल. अडकलेले पैसे परत मिळवण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. त्याकरता दुसऱयाची मदतदेखील घ्यावी लागू शकते. भावंडांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल. प्रेम प्रकरणांमध्ये निराशा संभवते. नोकरी करणाऱयांनी कट-कारस्थानांपासून दूर रहावे.
उपाय ः गणपतीला दुर्वांची माळ अर्पण करावी
धनु
ऑफिसमध्ये किंवा घरातील कामे वाढल्यामुळे तब्येतीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे. तुमच्या पाठीमागे कोण काय बोलते आहे याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असेल. भविष्याच्या दृष्टीने बचत करण्याकडे तुमचा कल असेल. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश प्राप्ती होईल. आईची काळजी वाटू शकते. धोकादायक गुंतवणूक टाळावी. नोकरदार वर्गाला प्रगतीचे मार्ग मिळतील.
उपाय ः हळदीचा टिळा लावावा.
मकर
उत्साहवर्धक घटना घडतील. आत्मविश्वासाला कमी पडू देऊ नका. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील व्यक्ती सहयोग करतील. कागदोपत्री व्यवहार जपून करावेत. जमिनीचे व्यवहार पुढे ढकलावे. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला अत्यंत अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल. कष्टाच्या मानाने मात्र फायदा कमी दिसतो. उपायः सायंकाळी शनि दर्शन घ्यावे.
कुंभ
व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाहीत. धनप्राप्ती कष्टाने होईल. फोनवर बोलताना किंवा मेल करताना योग्य शब्दांचा वापर करावा, गैरसमज होऊ शकतो. गुंतवणुकीतून अपेक्षेइतका फायदा होईल. नोकरदार वर्गाने वरि÷ांपासून चार हात लांब असावे. वैवाहिक जीवनात ताणतणाव संभवतो. मानसन्मानाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत.
उपाय ः पांढरे फूल शंकराला अर्पावे
मीन
स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम तब्येतीवर होईल. हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावून घेत आहे असे वाटण्याची शक्मयता आहे. कुटुंबात वाद विवाद संभवतो. स्थावर इस्टेटीच्या बाबतीत नशीब साथ देईल. धोकादायक गुंतवणूक मात्र टाळावी. प्रेमप्रसंगात मानहानी संभवते. पित्यासमान व्यक्तीची मदत मिळेल. सगळय़ा प्रकारच्या लाभाची शक्यता आहे.
उपाय ः अशोकाचे पान जवळ ठेवावे.