Tarun Bharat

राशी भविष्य

ऑक्टोबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती

क्र.        विशेष    तारीख  

1          शुभ दिवस         2 (सा. 7 प.),3,4,5,6(स.10 नं),8,9(दु.3 नं),10,11,12(दु.2 प),14 (दु 2 प),17,18,19,20(दु 4 नं),21,22(सा 6 प),24,26,27(दु 12 नं),28(स 11 प),30,31        

2          अशुभ दिवस      1,7,13,23,25,29          

3          अनिष्ट दिवस      1,13,   

4          सण/ उत्सव        2 (बानू सप्तमी, गांधी जयंती), 3 – दुर्गाष्टमी, 4- नवमी,5- दसरा, 6- पाषांकुशा एकादशी, 7- प्रदोष, 9- कोजागिरी पौर्णिमा, 13- संकष्टी, 14- अमावस्या, 21- रमा एकादशी, वसूबारस, 22- धनत्रयोदशी+शनी प्रदोष, 24 – नरक चतुर्दशी+ दिवाळी , 25 – खंड्ग्रास सुर्यग्रहण, 26 – भाऊबीज+बलिप्रतिपदा+दिवाळी पाडवा, 28-विनायकी,  29- पांडव पंचमी 

5          अमवस्या           25 खंड्ग्रास सुर्यग्रहण  ग्रहण वेध काळ ः मंगळवारी पहाटे 3.30 पासून सुर्यास्ता पर्यंत. स्पर्श सायं 5.00, मोक्ष सायं 06.30.  बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी दुपारी पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत     

6          पौर्णिमा  9- कोजागिरी पौर्णिमा     

7          साखरपुडय़ाचे मुहुर्त         2 (सा 5 प.), 4,5,6,9(दु 3 नं), 10, 14 (दु 2 नं),20 (दु 4 नं) 27 (दु 12 नं)       

8          बारसे (नाव ठेवण्या चे) मुहुर्त         4 (दु 2 नं), 5,6 (स 10 नं), 11 (दु 4 प.), 14 (दु 2 नं), 17, 27 (दु 12 नं),28 (स 11 प),31           

10        जावळाचे मुहुर्त   5, 6 (स 10 नं),10,17,19

11        भूमिपुजनाचे/ पायाभरणी चे मुहुर्त   30 (स. 7.30 नं) 

12        पाया खणणे मुहुर्त            27 (दु 12 प), 30           

13        गृहप्रवेशाचे मुहुर्त 2, 5, 6 (स 10 नं), 9 (दु 3 नं), 10, 14( दु 2 नं), 17, 28 (स 11 प),31           

14        ग्रह पालट          रवी – 17 (तुळ), मंगळ 16 (मिथून), बुध 26 (तुळ), शुक्र 18 (तुळ)    

15        व्यापार सुरु करण्याचे मुहुर्त          10, 22 (दु 2 ते सायं 6 प), 27 (12. 30 नं) 

16        वाहन खरेदी चे मुहुर्त        5, 6 (स 10 नं), 17, 27 (दु 12.15 नं)        

17        दागिने खरेदी चे मुहुर्त       17 उत्तर रात्री 5.12 ते 19 सकळी 8.02 पर्यंत         

18        मुसलमानी सण   9 – ईद-ए-मिलाद           

19        शुभ योग            रवी योग- 1, 2,4,5,15,17,28,29,30,31 सर्वार्थसिध्धी – 8,9,10,11,22,23,24 अम्रुत सिध्धी- 10,11,12,13,23,24, त्रि पुष्कर- 22         

20        पंचक    6-10-22 सकाळी 8.28  पासून 10-10-22  दु 4.02 पर्येंत     

राशी भविष्य

 मेष

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याकरता योग्य वेळ आहे. पूर्वीच्या मानाने चांगला नफा मिळण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला आपले काम वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये ताणतणावाचे प्रसंग येऊ शकतात. तीर्थयात्रा किंवा देव दर्शनाकरता प्रवासाचे योग आहेत. कौटुंबिक सुख उत्तम असेल.

उपाय ः पाच कवडय़ा वाहत्या पाण्यात सोडाव्या

 वृषभ

तब्येतीची काळजी मिटेल. धनागम सुगमतेने होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. प्रवासाचे योग आहेत. लिखापढीच्या कामामध्ये यश मिळेल. जमीनजुमल्याचे प्रश्न मार्गी लागतील. गुंतवणुकीतून नुकसानीची शक्मयता नाकारता येत नाही. नोकरदार वर्गावर चुकीचा आळ येण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुर क्षण येतील. भाग्याची साथ आहे.

उपाय ः कुमारी पूजन करावे

 मिथुन

उत्साह आणि आत्मविश्वास यांनी भरलेला काळ असेल. तब्येतीची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. घरात एखादा समारंभ साजरा होऊ शकतो. पैशांची आवक उत्तम असेल. प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टी संबंधित निर्णय सध्या टाळावेत. प्रेम प्रसंगांमध्ये यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात.

उपाय ः गायीच्या खुराखालील माती जवळ ठेवावी.

कर्क

अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्मयता आहे. हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल पण त्यामध्ये दुसऱयाची मदत मात्र घ्यावी लागेल. पैशांच्या बाबतीत निश्चिंत रहा. प्रवास सध्या टाळलेला बरा. कुठल्याही कागदावर सही करत असताना सावध राहण्याची गरज आहे. आईच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू शकते. जमीन किंवा वाहन खरेदी विक्री सध्या टाळावी. वैवाहिक सुख उत्तम असेल.

 उपायः मंदिरात शिधा दान द्या

सिंह

 इच्छापूर्तीचा काळ आहे. जुनी राहिलेली कामे पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण असेल. काही जुनाट विचारसरणीच्या लोकांचा त्रास होऊ शकतो. पैशांच्या बाबतीमध्ये जास्त अपेक्षा करणे ठीक राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमजाचा त्रास होऊ शकतो. कागदोपत्री व्यवहार जपून करावेत, चूक होऊ शकते. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे.

उपाय ः देवीला कुंकूमार्चन करावे

 कन्या

उलट सुलट खाल्ल्यामुळे किंवा कुपथ्य केल्यामुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. काहीवेळा वैद्यकीय सल्ला घ्यावा लागू शकतो. घरातील एखाद्या सदस्याचा  हट्ट पूर्ण करण्याकरता कसरत करावी लागेल. पैशांच्या बाबतीमध्ये तितकासा अनुकूल काळ नाही. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता जास्त आहे. जोडीदाराशी वाद संभवतो.

उपायः हिरवे वस्त्र जवळ ठेवावे

 तूळ

 तब्येतीला जपा. स्नायूंशी संबंधित त्रास होऊ शकतो. पैसे उत्तमरित्या मिळतील. कुटुंबातील सदस्यांकरता विशेष प्रयत्न कराल. प्रवास सध्या टाळलेला बरा. शेजाऱयांशी मतभेद संभवतात. प्रॉपर्टीसंबंधी कामांमध्ये यश मिळेल, स्वभाव रोमँटिक होईल. नोकरीमध्ये त्रास संभवतो. वैवाहिक जोडीदाराबरोबर भांडण-तंटे टाळावेत. अपघातापासून सावध रहा. आध्यात्मिक अनुभूती येईल.

उपाय ः लहान मुलीला आंबट गोड मिठाई द्यावी

वृश्चिक

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा होण्याची शक्मयता जास्त आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कोणाच्याही व्यवहारामध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडल्यास नुकसान होऊ शकते. पैशांच्या बाबतीमध्ये तितकेसे अनुकूल ग्रहमान नाही. कुटुंबातील व्यक्तींशी वाद संभवतो. प्रवासातून ओळखी होतील. श्रीमंत लोकांसोबत ऊठबस होईल. प्रेमींना काळ अनुकूल नाही.

उपाय ः तांब्याचे कडे घालावे

धनु

तुमच्या दूरदर्शीपणाचे कौतुक होईल. हाती घेतलेल्या योजनांमध्ये यश मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्याल. नको त्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता जास्त आहे. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. लिखाणाचे कौतुक होईल. धोकादायक गुंतवणूक टाळावी. प्रेमामध्ये अपेक्षाभंग संभवतो. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा जाच सहन करावा लागेल.

उपाय ः गुरुवारी दत्त दर्शन घ्यावे

 मकर

तुमच्या नियोजन कौशल्याच्या मदतीने अवघड कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या बुद्धिमत्तेचा तुमच्यापेक्षा इतरांना फायदा जास्त होईल. काही अनुभवांमुळे नुकसान होण्यापासून वाचेल. मातृ चिंतेचा काळ आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून फायद्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंध दृढ होतील. नोकरदार वर्गाला अनुकूल वेळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये सहकार्याची भावना जपाल.

 उपाय ः छाया दान करावे

कुंभ

येणाऱया काही दिवसांमध्ये पैशांची चणचण वाटण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करत असताना कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. आलेले पैसे गुंतवण्याकडे कल असू द्यावा. कुटुंबातील वादावादी कुटुंबापुरती ठेवावी. इतरांना त्याची खबर कळता कामा नये याची काळजी घ्या. गुंतवणुकीतून मनासारखा फायदा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल.

उपाय ः पक्ष्यांना दाणे घाला

 मीन

तब्येतीला जपावे लागेल. धावपळ जास्त झाल्यामुळे शारीरिक ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात मनासारखे यश मिळण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबातील वातावरण तितकेसे पोषक असणार नाही. शेजाऱयांकडून मदत मिळण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीसंबंधी प्रश्न संपतील. प्रेमसंबंध दृढ होतील. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये ताण तणाव जाणवेल.

उपाय ः हळदीचा टिळा लावावा

Related Stories

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 जुलै 2020

Patil_p

आजचे भविष्य 24-06-2022

Amit Kulkarni

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 6-08-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 21 नोव्हेंबर 2020

Patil_p