Tarun Bharat

राशी भविष्य

Advertisements

गुप्त आणि दुर्मीळ-जगदंबेची चक्रपूजा

आपल्या सगळय़ांचीच इच्छा असते की आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य मिळावे. याकरता आपण वेगवेगळय़ा प्रकारची व्रते करतो. विघ्नांचा नाश व्हावा म्हणून कोणी संकष्टी करतो. कोणी गुरुचरित्राचे पारायण करतो. कोणी नाथसंप्रदायी असतो. यातील गुपित एकच आहे की आपल्या अंतर्मनातून निघालेली आर्त साद ब्रम्हांडापर्यंत या व्रतवैकल्यांच्या रूपाने पोहोचते आणि ब्रम्हांडाकडून सकारात्मक परिणाम मिळतो. दसऱयाच्या दिवशी सगळय़ा इच्छा पूर्ण करणाऱया चक्र पूजेविषयी माहिती सांगतो. हा एक अचूक उपाय आहे. ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला त्यांना  याचा अनुभव आला आहे. गरज आहे ती फक्त श्रद्धेची, मनातल्या भावाची. ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव’ हे होत नाही. सगळय़ा प्रकारचे दुःख दैन्य दूर करून सौभाग्य आरोग्य धनसंपदा यांची प्राप्ती करून देणाऱया चक्र साधनेविषयी माहिती सांगतो. अतिशय गुप्त आणि दुर्मीळ असणारी ही साधना लोकांनी करून स्वतःचे हित साधावे हा उद्देश आहे. याला चक्र पूजा असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि बंजारा समाजामध्येही चक्र पूजा केली जाते. ही पूजा मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी किंवा वासंतिक आणि शारदीय नवरात्र यातल्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. ही पूजा सूर्यास्तानंतर करण्याची प्रथा आहे. याला एक कारण म्हणजे प्रकाश हा क्षणभंगूर आहे आणि अंधार हा सर्वव्यापक आणि कायमस्वरूपी आहे. म्हणून कालरात्री हे देवीचे रूप पूजले जाते. काही ठिकाणी चक्र पूजेच्या वेळेला बळीची प्रथाही पाळली जाते. ज्या दिवशी तुम्हाला ही पूजा करायची आहे त्यादिवशी सूर्यास्ताअगोदर पूजेची जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी, गोमूत्र शिंपडावे. सात वातींची समयी लावावी. सुवासिक धूपबत्ती लावावी. पूजा करणाऱयांनी त्यादिवशी उपवास धरणे आवश्यक आहे. सूर्यास्तानंतर खोलीच्या मध्यभागी कुटुंबातील ज्या लोकांना ही पूजा करायची आहे त्यांनी गोलाकार करून, आसन न घेता, एकमेकांचा हात धरून जमिनीवर बसावे. पुरुषांनी सोवळे नेसून पूजा करावी. मध्यभागी हरभरा, मसूर, मूग, उडीद आणि तांदूळ यांची एका बाहेर एक अशी पाच वर्तुळे तयार करावीत. मध्यभागी पूजेची सुपारी जमिनीकडे टोक करून ठेवावी. ही सुपारी अक्षतांच्या आसनावर ठेवायची आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या वर्तुळाच्या बाहेर 6 सुपाऱया समान अंतरावर ठेवाव्यात. नंतर मुख्य साधकाने मधल्या सुपारीला हात लावून ‘जगदंब आवाहयामी’ हा मंत्र 27 वेळा म्हणावा. जगदंबेचे आगमन त्या सुपारीमध्ये झालेले आहे असे समजून त्या सुपारीची मनोभावे पंचोपचार पूजा करावी. आता जगदंबेचा प्रवेश झालेली ती सुपारी पुन्हा केंद्रस्थानी ठेवून ‘ॐ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।’ हा मंत्र तीन वेळा म्हणावा आणि पहिल्या वर्तुळाच्या बाहेर ठेवावी. परत तीन वेळा म्हणावा त्याच्या बाहेरच्या वर्तुळात ठेवावी. अशाप्रकारे पाचवे वर्तुळ पार झाले तरी परत तीन वेळा म्हणावा आणि त्याच्या आतल्या वर्तुळात ठेवावी अशाप्रकारे एकूण नऊ वेळेला ही सुपारी आतून बाहेर आणि बाहेरून आत आपल्या मूळ ठिकाणी येईल आणि मंत्र 27 वेळा म्हटला जाईल. नंतर प्रत्येकाने गंध, फूल, हळद, कुंकू वहावे. मुख्य साधकाने बळी म्हणून एक कोहाळा बुक्कीने फोडावा. दूध आणि कोहाळय़ाचा नैवेद्य दाखवावा. देवीची आरती म्हणावी. इतर कोणतीही आरती म्हणू नये. त्यानंतर बाहेरील एक एक सुपारी घेऊन  दारिद्यं विनश्यतू, दुखं विनश्यतू,, शोकं विनश्यतू,, पर मंत्र-तंत्र-यंत्र विनश्यतू, भप्यं विनश्यतू,, अनारोग्यं विनश्यतू, असे म्हणून अडकित्याने फोडाव्यात. त्या तुकडय़ांवरती करवंटी झाकावी. त्वं वैष्णवी शक्तिरनन्त वीर्या विश्वस्य बीजं परमासि माया । सम्मोहितं देवि समस्तमेतत् तवं वै प्रसन्न भुवि मुक्ति हेतुः ।। हा मंत्र प्रत्येकाने 9 वेळा म्हणून देवीची प्रार्थना करावी. मुख्य सुपारी जपून ठेवावी. जगदंबेची पूर्ण कृपा प्राप्त होते. फोडलेल्या सुपाऱया लांब टाकून याव्यात. तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना, आप्तांना दसऱयाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळय़ा मनोकामना भगवती पूर्ण करो. शुभं भवतू.

मेष 

घरातील लोकांबरोबर लहान सहल आयोजित कराल. आनंदी वातावरण असेल. लिखाणाचे कौतुक होऊ शकते. सोशल मीडियामुळे फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याकरता योग्य काळ आहे. कपट-कारस्थानाला बळी पडण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या कौशल्याचे कौतुक कराल. लाभाची शक्मयता जास्त आहे.

उपाय अनाथाश्रमामध्ये फळांचे वाटप करा

वृषभ

आरोग्याच्या दृष्टीने तितकासा चांगला काळ नाही. पोटाचे विकार संभवतात. घरामधील वातावरण चांगले असेल. प्रवासाचे योग आहेत. जमीन-जुमल्याच्या व्यवहारास गती येईल. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. नोकरीमध्ये त्रास होण्याची शक्मयता आहे. जोडीदाराशी मतभेद होतील. लाभाकरता विशेष प्रयास करण्याची आवश्यकता आहे.

उपाय गाईला हिरवा चारा घालावा

मिथुन

कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सामील व्हाल. नातेवाईक भेटल्यामुळे मन आनंदी असेल. तब्येत उत्तम असेल. प्रवास शक्मयतो टाळावा. छोटय़ा गुंतवणुकीतून नुकसान संभवते. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये एखाद्या घटनेचे वाईट वाटू शकते. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या सवयीमुळे वाद-विवाद होऊ शकतो. भाग्य साथ देईल.

उपाय तुळशीला दूधमिश्रित पाणी घालावे

कर्क

काही घटनांमुळे मन विचलित होऊ शकते. व्यवसायाच्या ठिकाणी मनाजोगते काम न झाल्याने निराश होऊ शकता. अनपेक्षितरित्या अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबातील व्यक्तीवर विनाकारण शंका घेऊ नका. प्रवासाचे प्लॅन सध्या रद्द केलेले बरे. कॉन्ट्रक्टवर सही करताना सावध राहावे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गैरसमज होतील.

उपाय गणपतीला शमीपत्र वाहावे

सिंह

तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. पैशांची आवक वाढेल. नातेवाईकांच्या घरी भेट द्याल. कामाकरता प्रवास होईल. त्यामुळे मन  प्रसन्न होईल.  शेअर्ससारख्या गुंतवणुकीतून नुकसान संभवते. प्रेमीबरोबर वादावादी होईल. कारण नसताना नोकरीत त्रास संभवतो. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

उपाय वृद्ध व्यक्तीला औषधांचे दान घ्यावे

कन्या

आरोग्याचा पाया तितकासा मजबूत नसल्याने तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तब्येत नाजूक असेल तर जनसंपर्क टाळावा. अपेक्षा केलेली नसताना येणारी रक्कम थांबल्यामुळे मनस्तापाची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीशी वाद संभवतो. प्रवासातून नुकसान होण्याची शक्यता आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभाची संभावना आहे. प्रेमींना अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल.

उपाय वस्त्र दान करावे

तूळ

 जागरण केल्याने किंवा कुपथ्य केल्याने तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पैशांची आवक वाढवण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील त्याचबरोबर इतरांची मदत घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहावे याकरता दक्ष राहा. प्रवास घडेल. हरवलेली कागदपत्रे सापडण्याची शक्मयता आहे. जमिनीचे व्यवहार किंवा वाहन खरेदी सध्या नको. गुंतवणुकीतून लाभ होईल.

 उपाय  सार्वजनिक अन्नदानाला मदत करावी

वृश्चिक

तुमच्या बोलण्यामुळे एखाद्याचे मन दुखावले जाऊ शकते. बोलताना शब्दांचा वापर  काळजी पूर्वक करावा. आर्थिक आवक समाधानकारक असणार नाही. कुटुंबात वाद संभवतो. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे मन उदास असेल. जोडीदाराच्या वागण्याचा त्रास होईल. वाहन चालवताना सावध राहावे.

 उपाय कुंभाराला दुधाचे दान द्यावे

धनु

आर्थिक बाबतीमध्ये सगळय़ा बाजूने यशप्राप्तीचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आल्हाददायक असेल. प्रवास शक्मयतो टाळलेला बरा. सही करताना जपून करावी. उत्साहाच्या भरात  धोकादायक गुंतवणूक करण्याच्या मोहात पडू नका. प्रेम संबंधांमध्ये तणावाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला जाच संभवतो.

उपाय  मंदिरात श्रमदान करावे

मकर

मानसिक त्रासामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. कोणताही ताण तणाव घेणे टाळावे. कुटुंबातील व्यक्तींच्या सहवासात वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. एखाद्या समारंभामध्ये सामील होऊ शकता. लांबून एखादी खबर कळू शकते. परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर अनुकूल काळ आहे.

उपाय लहान मुलांना बत्तासे वाटावेत

कुंभ

मध्यंतरी तब्येतीचा झालेला त्रास आता कमी होईल. पण कुपथ्य करण्यापासून दूर रहा. आर्थिक बाबतीमध्ये यशप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. कामे होतील पण विलंब संभवतो. प्रवासातून धनप्राप्तीचे योग आहेत. भावंडाची साथ मिळेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने सावध रहावे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल.

 उपाय पूर्वाभिमुख गणपतीचे दर्शन घ्यावे.

मीन

सणासुदीच्या दिवसांमध्ये तब्येत बिघडू नये याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही बाबतीमध्ये अति होऊ देऊ नका. पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. बाप्पाच्या कृपेने प्रवास घडेल आणि त्यातून फायदाही होईल. कागदोपत्री व्यवहारामध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने आपल्या कामाच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे.

उपाय सफाई कर्मचाऱयांना मिठाई दान द्यावी

Related Stories

आजचे भविष्य 07-10-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 6 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य 02-07-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!