Tarun Bharat

रशिद, रबाडा, लिव्हिंगस्टोन ‘एमआय केपटाऊन’ संघात

Advertisements

केपटाऊन / वृत्तसंस्था

उद्घाटनाच्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका टी-20 लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स प्रँचायझी एमआय केपटाऊन नावाने संघ उतरवणार असून त्यात अफगाणचा स्टार फिरकीपटू रशिद खान, दक्षिण आफ्रिकेचा स्पीडस्टार कॅगिसो रबाडा व आक्रमक इंग्लिश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन यांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा डेव्हाल्ड ब्रेविस व इंग्लिश अष्टपैलू सॅम करण यांनाही एमआय केपटाऊन संघात थेट एन्ट्री देण्यात आली.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रशिद गुजरात टायटन्सकडून, रबाडा व लिव्हिंगस्टोन पंजाबकडून खेळतात. करण मागील आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळला. एमआयने आतापर्यंत 3 विदेशी, 1 दक्षिण आफ्रिकन व 1 नवोदित द. आफ्रिकन खेळाडूला करारबद्ध केले आहे.

Related Stories

रेड बुलचा व्हर्स्टापेन नवा वर्ल्ड चॅम्पियन

Patil_p

मेदवेदेव्हच्या पराभवामुळे जोकोविच पुन्हा अग्रस्थानी

Patil_p

‘फिनिशर’ धोनीमुळे मुंबई ‘फिनिश’!

Amit Kulkarni

मिसबाह, वकार युनूस यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

मेक्सिकोचे दोन खेळाडू कोरोना बाधित

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाचे जपानमध्ये आगमन

Amit Kulkarni
error: Content is protected !!