प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर विठ्ठलदेव गल्ली येथील विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मंगळवारी पार पडला. दरवषी कोजागरी पौर्णिमेला काकडारतीला सुरुवात होते. त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. ही परंपरा 1652 पासून गेली 370 वर्षे अखंड सुरू आहे.
विठ्ठलदेव गल्लीपासून रथोत्सवाला प्रारंभ होऊन आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, होसूरमार्गे रथ पुन्हा मंदिराकडे आला. या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळय़ा घालण्यात आल्या होत्या. रथात विराजमान झालेल्या श्री विठ्ठलदेवाची आरती करून श्रीफळ वाढविण्यात येत होते.
रथोत्सवासाठी वे.शा.सं. नागेशशास्त्राr हेर्लेकर, मंदार देऊळकर, विकास कुलकर्णी, संतोष चिकोर्डे, गणपतराव चिकोर्डे यांनी परिश्रम घेतले.