वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हाँगकाँगमध्ये सुरु असलेल्या पीएसए चॅलेंज चषक स्क्वॅश स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या एस. रतिकाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाच्या तृतीय मानांकित सेहवीतरा कुमारने रतिकाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सेहवेत्रा कुमारने रतिकाचा 11-6, 11-8, 11-6 अशा गेम्समध्ये पराभव केला. सहाव्या मानांकित रतिकाने गेल्या आठवड्यात इंदौरमध्ये झालेल्या स्क्वॅश स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.