Ration card holders waiting for Rs 100 kit
शिंदे फडणवीस सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी दिवाळीत शंभर रुपयात महागाईच्या पार्श्वभूमीवर चार वस्तू गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्यापही रेशन कार्ड या गिफ्ट पासून वंचित आहेत .शासकीय गोदामात केवळ साखर आणि चणाडाळ येऊन पडली आहे .परंतु पामतेल आणि रवा अद्यापही आलेला नाही. त्यामुळे या वस्तूंचे किट वाटप दिवाळीनंतर वितरित होणार की काय असा प्रश्न पडला आहे. शिंदे फडणवीस सरकारने महागाई ने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी शंभर रुपयात साखर पामतेल, रवा ,चनाडाळ या चार वस्तूंचे कीट देण्याचा निर्णय घेतला. परंतु दिवाळी दोन दिवसावर येऊन ठेपली तरीही रेशन कार्डधारकापर्यंत हे किट पोचलेले नाही. सावंतवाडीच्या गोदामात 25 टन साखर आणि चार ते पाच टन चनाडाळ येऊन पडली आहे .
परंतु रवा ,पामतेल अद्याप आलेले नाही. साखर आणि चणाडाळी अपुरी आलेली आहे त्यामुळे पूर्ण किट वितरणास आणखी कालावधी जाणार आहे रेशन कार्डधारक मात्र या किटच्या प्रतीक्षेत आहेत सावंतवाडी तालुक्यात अंत्योदय आणि इतर लाभार्थी रेशन कार्डधारक 26हजार आहेत हे कार्ड या किटच्या प्रतीक्षेत आहेत .शासनाने दिवाळीला हे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला होता .परंतु वितरणात अडचणी आहेत. दिवाळीपूर्वी हे वितरण होणार काय असा प्रश्न विचारला जात आहे. रास्त धान्य दुकानदारी पुरवठा विभागाकडे येऊन या किटची चौकशी करीत आहेत.
सावंतवाडी / प्रतिनिधी