साडेतीन टन तांदळाची बेकायदा वाहतूक
प्रतिनिधी / बेळगाव
नेसरगीजवळ बुधवारी साडेतीन टन रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. नेसरगी पोलिसांनी ही कारवाई केली असून कैतनाळ येथील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेसरगीचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. महिंद्रा पिकअप वाहनातून हा तांदूळसाठा गोकाककडे नेण्यात येत होता. यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसांनी पिकअप अडवून तपासणी केली असता तांदूळसाठा आढळून आला. रामचंद्र महादेव जोरापूर (वय 25, रा. कैतनाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेळगाव जिल्हय़ातील वेगवेगळय़ा तालुक्मयात रेशन तांदळाचा काळाबाजार
वाढला आहे. मुरगोड, नंदगड, संकेश्वर पाठोपाठ नेसरगी पोलिसांनीही तांदूळसाठा जप्त केला आहे.