Tarun Bharat

Ratnagiri : गुहागरात अधिकाऱ्यास ७७ हजारांचा ऑनलाईन गंडा!

कोणताही फोन नाही, ओटीपी नाही तरीही गायब झाली रक्कम

गुहागर प्रतिनिधी

कोणताही फोन नाही, कोणालाही ओटीपी दिला नाही, तरीही तालुक्यातील एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापकपदावर असलेल्या अधिकाऱ्याला ७६ हजार ७३४ रूपयांचा ऑनलाईन गंडा एका अज्ञाताने घातला असल्याचे समोर आले आहे. येथील पोलीस ठाण्यात त्या अज्ञाताविरोधात फसवणुकीचा सायबर गुन्हा दाखल झाला आहे.

ऑनलाईन पद्धतीने आपल्या ॲक्सीस बँकेच्या खात्यामधून रक्कम डेबीट झाल्याची फिर्याद तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील दिलीपकुमार रामजन्म सिंह याने गुहागर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल केली आहे. दिलीपकुमार सिंह हे कोकण एलएनजीमध्ये पोर्ट मॅनेजर या पदावर काम करत आहेत. त्यांचे जमशेदपूर जिल्ह्यातील साक्ची ॲक्सीस बँकत खाते आहे. शुकवारी सकाळी ते उठल्यावर त्यांनी नेहमीपमाणे आपले जी-मेल खाते पाहिले. त्या खात्यावर ते आपले मेल चेक करत असताना त्यांना ॲक्सीस बँकेचा मेल आला होता. त्या मेलमध्ये त्यांच्या खात्यामधील ७६७३४ रूपये डेबीट झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ॲक्सीस बँक कस्टमर केअर व ऑनलाईन ॲप्लीकेशनद्वारे खात्यातून डेबीट झालेल्या पैशाची स्लीप काढली. तसेच बँकेजवळ संपर्क साधून या प्रकाराची माहिती देऊन आपले खाते ब्लॉक करावयास सांगितले. ही रक्कम कमी होण्याआधी त्यांना कोणताही अनोळखी कॉल आलेला नाही किंवा कोणाला आपल्या खात्याची माहिती अथवा बँकेचा ओटीपी आलेला नाही, असे त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

या प्रकारामुळे खळबळ उडाली असून अशाप्रकारची रक्कम गायब होण्याच्या प्रकाराने सायबर गुन्ह्यालाच आव्हान ठरले आहे. गुहागर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर भादंवि कलम ४२०, ४१९ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ क, ड पमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सावर्डे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत.

Related Stories

कोकणातील पहिले भाजीपाला कोल्ड स्टोअरेज जामगेत!

Patil_p

चिपळुणातील उड्डाण पुलास पुढील महिन्यात प्रारंभ!

Patil_p

जिह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली

Patil_p

जिह्यात ‘डेल्टा प्लस’चे आणखी 2 रूग्ण

Patil_p

कमोडिटी मार्केटमधील गुंतवणूकदारांची ‘चांदी’

Patil_p

दापोलीतील मंडल अधिकारी अद्याप फरार

Patil_p